वागातोर समुद्रकिनाऱ्यावर रेव्ह पार्टी चे आयोजन करण्याकरिता अज्ञातांकडून सुरू असलेली तयारी व लावण्यात येणारे सेट्स..

.

म्हापसा  दि. 27  ( प्रतिनिधी )

      हणजूण, वागातोर, हडफडे, कळंगुट, कांदोळी, शिवोली या भागात संगीताचे पडघम वाजू लागले असून या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या रेव्ह पार्ट्यांचा सुकाळ आलेला आहे, हे या भागात लावण्यात आलेले रेव्ह पार्टी आयोजनाचे बॅनर्स, हॉटेल पब मधून काउंटरवर ठेवण्यात येणारे तसेच आयोजकांच्या हस्तक/दलालांकडून वाटण्यात येणारे फ्लायर्स यावरून आढळून येते.
        वागातोर किनाऱ्यावर असलेल्या शॅक्स, पब व हाटेल मधून रोज रेव्ह पार्ट्याचे आयोजन केले जात असून या कर्णकर्कश वाजणाऱ्या संगीताचा त्रास येथील स्थानिक जनतेला भोगावा लागत आहे. वागातोर येथे असलेल्या कॅफे मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या रेव्ह पार्टीच्या वेळी सामान्य पर्यटकांना व स्थानिकांना चालत जाण्यासाठी पार्क केलेल्या वाहनातून रस्ता शोधावा लागतो,  स्थानिकांना तर दुचाकी वाहन पार्क करण्यासाठी जागा सापडणे कठीण होते.
      सद्या गोव्याशेजारच्या महाराष्ट्र व कर्नाटकात करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी व दुसरे निर्बंध घालण्यात आल्याने येथील युवा दमाच्या पर्यटकांनी गोव्यात मोर्चा वळवल्याने गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.किनारी भागात होणाऱ्या या रेव्ह पार्ट्यातून कर्नाटक तेलगांणाचे पर्यटकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
        मुबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने या रेव्ह पार्ट्यासंदर्भात तक्रारदार सागरदीप शीरसईकर यांच्या तक्रारीवर पोलिसांना या बेकायदा संगीत रजनीवर कठोर कारवाई बाबत निर्देश देत या बाबतच्या तक्रारीकरिता एक फोन क्रमांक जाहीर केला पण या क्रमांकावर तक्रार करूनही काहीच कारवाई होत नसल्याचे वागातोर येथील ग्रामस्थ वाय. कामत यांनी सांगितले.
        वागातोर येथे मोठ्या प्रमाणात होणारा सनबर्न संगीत महोत्सव यंदा होणार नसला तरी या आयोजकांनी येथील हॉटेल हिलटॉप या हॉटेलच्या जागेत लहान प्रमाणात सनबर्न चे आयोजन केले आहे, तर याचाच भाग म्हणून अज्ञातांकडून वागातोर समुद्रकिनाऱ्यावर ड्रीमबीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेत येत्या एक दोन दिवसात मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्टी करण्याकरिता मोठमोठे सेट लावण्याचे काम सुरू केल्याने स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त होत आहे, कारण या किनाऱ्यावरील रेव्ह पार्ट्यामुळे पहाटेच्या वेळी किंवा सायंकाळी चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. करोनाच्या तिसऱ्या लाटेची संभवना पाहता या रेव्ह पार्ट्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक जनतेकडून करण्यात येत आहे.
      फोटो….. वागातोर समुद्रकिनाऱ्यावर रेव्ह पार्टी चे आयोजन करण्याकरिता अज्ञातांकडून सुरू असलेली तयारी व लावण्यात येणारे सेट्स……..  ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें