तर सुरज शेटगावकर ( मोरजी) याने दुसरा क्रमांक पटकावला. अनुष्का थळी ( चोडण) हीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. संदीप कामुलकर ( मांद्रे) याला प्रथम उतेजनाथ प्रेमानंद कलशावकर ( मांद्रे) याला दुसरे उतेजनाथ तर राशी देसाई ( मंडूर) हिला तृतीय उतेजनाथ बक्षीस प्राप्त झाले. परीक्षक म्हणून समाज्ञी शेलार व अॅड अमीत सावंत यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट क्लबचे अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर उपस्थित होते. यावेळी अॅड दिपक तिळवे, संदीप वालावलकर, प्रकल्प अधिकारी विनोद मळीक, चंद्रकांत आमोणकर, अभय हजारे, योगेश हिरवे, नितीन नेवगी आदी उपस्थित होते
देवस्थान चे अध्यक्ष सदगुरू कासकर यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन प्राध्यापक विनोद मळीक व नारायण हिरोजी यांनी केले. देवस्थान चे अध्यक्ष रवळनाथ पुखै यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण मातोंडकर, प्रदीप मातोंडकर, सुरेश नाईक, गजानन पेडणेकर, नंदकिशोर हळणकर, विनोद सांगोडकर, दिपक डांगी यांनी परीक्षम घेतले. संदीप वालावलकर यांनी आभार मानले,.
वेताळ देवस्थान खरै वाडे सुकुर व सम्राट क्लब म्हापसा आयोजित अखिल गोवा एकपात्री सवेश ( संवादासहीत) नाट्य गीत ( नाट्य अविष्कार) १५ वर्षावरील गायन स्पर्धेत हर्षा गणपुले ( वाळपई) हीने प्रथम क्रमांक- पटकावला
.
[ays_slider id=1]