गोमंतकीयांप्रती माणुसकी दाखवुन पेट्रोल-डिझेलचे दर ₹८० प्रती लिटर करा – युरी आलेमाव

.

मडगाव – असंवेदनशील भाजप सरकारने पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलींडरचे दर वाढवुन सामान्य जनतेवर आर्थीक बोजा टाकणे सुरूच ठेवले आहे. गोव्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यानी भाजपचा प्रोपोगांडा करणाऱ्या “काश्मीर फाईल्स” चित्रपटाला “टॅक्स फ्री” जाहीर करण्याची घोषणा केली. डॉ. प्रमोद सावंतानी आता गोमंतकीय जनतेपोटी माणुसकी दाखवुन पेट्रोल व डिझेलचे दर रुपये ८० प्रती लिटर पर्यंत नियंत्रीत करावेत अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

मागील चार दिवसात घरगुती गॅसची किम्मत ५० रुपयांनी वाढविण्यात आली तर पेट्रोल व डिझेलचे दर आज तिसऱ्यांदा वाढविण्यात आले. आज पेट्रोल व डिझेल ८० पैसे लिटर महाग झाले हे धक्कादायक आहे. भाजपची असंवेदनशीलता व बेजबाबदारपणा यातुन उघड होतो अशी टीका युरी आलेमाव यांनी केली आहे.

कॉंग्रेस पक्षाचे नव्यानेच निवडुन आलेले आमदार हे तरुण असुन, लोकविरोधी निर्णयांविरूद्ध सरकारला जाब विचारण्याची धमक आमच्यात आहे हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे व गोमंतकीयांच्या संवेदनांशी व भावनांशी खेळू नये. आगामी विधानसभा अधिवेशनांत आम्ही जनतेचा आवाज बनुन सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

कॉंग्रेस पक्षाने ” रोड मॅप टू गोवा व्हिजन -२०३५” जाहिरनाम्यात पेट्रोल व डिझेलचे दर रु.८० प्रती लिटरवर नियंत्रीत करण्याचे वचन दिले होते. आमचे वरिष्ठ नेते व माजी अर्थमंत्री डॉ. पी. चिदंबरम यांनी योग्य अभ्यास करुनच सदर वचन जाहिरनाम्यात टाकले होते. वॅट कमी करुन, पॅट्रोल व डिझेलचे दर कमी करणे शक्य असुन, त्यासाठी सत्तेत असलेल्यांकडे लोकांप्रती संवेदना दाखविण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात जे शक्य आहे तेच देण्याचे वचन लोकांना दिले होते. आज गोमंतकीयांनी उभे राहुन लोकविरोधी निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारला पाठींबा देणाऱ्या आमदारांना जाब विचारला पाहिजे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें