म्हापसा दत्तवाडी येथे दत्तात्रय देवस्थानाजवळ एका चाळीतील पाच घरांना आग लागून सुमारे तीन लाख साठ हजारांचे नुकसान झाले

.

 

म्हापसा दत्तवाडी येथे दत्तात्रय देवस्थानाजवळ एका चाळीतील पाच घरांना आग लागून सुमारे तीन लाख साठ हजारांचे नुकसान झाले. हि घटना दि. दि.11 रोजी रात्रौ उशीरा घडली, दि.12 रोजी 00.40 वा. म्हापसा पोलिसांना आगीची माहिती मिळाली.
म्हापसा अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहिती नुसार सुरवातीला येथील लक्ष्मी मारुती यल्लानी हिच्या घरात प्रथम आग लागली असावी ती आग पुढे चंपा एवल्क, रामदास चौहान, अशोक दुर्गा तलवार, आणी कस्तुरी तलवार यांच्या घरात पोहचली.हि सर्व घरे एकाच भिंती लगत होती.
आग आटोक्यात आणण्याकरिता म्हापसा च्या दोन, पर्वरी येथील एक व पणजी येथील पणजी येथील एक अश्या चार गाड्यांचा वापर करण्यात आला. हि घरे अडचणीच्या ठिकाणी असल्याने अग्निशामक दलाची वाहने वेळेवर न पोहचल्याने आगीवर नियंत्रण आणण्यास विलंब लागला पण तिन्ही ठिकाणाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून साडेतीन तासात आग आटोक्यात आणली. या आगील लक्ष्मी हिचे दोन लाखांचे, चंपा हिचे एका लाखाचे, रामदास याचे विस हजारांचे, अशोक याचे विस हजारांचे, आणी कस्तुरी हिचे विस हजरांचे नुकसान झाले. लागलेल्या आगीत घराचे वासे, कौले, फ्रिज, गॅस सिलेंडर, कपडे, दागिने व रोख रक्कम जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी जळणारा गॅस सिलेंडर विझवून बाहेर काढला.
आग आटोक्यात आणण्याकरिता म्हापसा अग्निशामक दलाचे सुरज शेटगावकर, देवेंद्र नाईक, वासुदेव ताटे, परेश मांद्रेकर, प्रवीण गावकर, प्रशांत शेटगावकर, प्रेमानंद कांबळी, पर्वरी अग्निशामक दलाचे सलीम शेख, लक्ष्मण परवार, गौरेश नाईक, महेश माजिक तसेच पणजी अग्निशामक दलाच्या प्रकाश कन्नाईक, सुचित सावळ, रॉनी डिसोझा, राजन पेडणेकर व दत्ताराम देसाई या जवानांनी आग आटोक्यात आणली.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें