जिओ इन्स्टिट्यूट तर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया सुरू

.

 

जिओ इन्स्टिट्यूट तर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया सुरू

डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स साठी मागवले अर्ज

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्केटिंग कम्युनिकेशन्स , डेटा सायन्स, डिजिटल मीडिया  यांनी आपलं आजचं जीवन व्यापून टाकायला सुरुवात केली आहे. आजच्या इंटरनेट युगाची ती गरज आहे. त्यामुळेच जसजसा त्यांचा वापर वाढणार, तसतसं या क्षेत्रातलं प्रशिक्षित मनुष्यबळही लागणार. याचा विचार करून जिओ इन्स्टिट्यूटने या क्षेत्रातल्या पदव्युत्तर पूर्ण वेळ शिक्षणक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. हा शिक्षणक्रम एक वर्षाचा असेल.

जिओ इन्स्टिट्यूटतर्फे नुकतीच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन या संस्थांनी सामाजिक दातृत्वाच्या अनुषंगाने पुढाकार घेऊन जिओ इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतलं उच्च शिक्षण देणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. नव्या मुंबईत असलेल्या या संस्थेकडून 2019 पासून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.

ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे जिओ इन्स्टिट्यूटचे कुलपती (Chancellor) असून, डॉ. दीपक जैन हे कुलगुरू (Vice Chancellor) आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS), तसंच, डिजिटल मीडिया अँड मार्केटिंग कम्युनिकेशन्स (DM & MC) या पदव्युत्तर पूर्ण वेळ शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी जिओ इन्स्टिट्यूटने इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.

कोणासाठी उपयुक्त?
AI & DS या शिक्षणक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स या विषयांची थिअरी, तसंच त्यांचा समाजातला प्रत्यक्ष वापर यांबद्दलचं शिक्षण दिलं जाणार आहे. DM & MC मध्ये विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव कसा देता येईल, त्यांच्याशी चांगला संवाद कसा साधता येईल, याबद्दलचं ज्ञान मिळेल. डेटा सायंटिस्ट, AI रिसर्चर्स, इंडस्ट्रियल आणि सोशल एंटरप्रेन्युअर्स आदी बनू इच्छिणाऱ्या अर्ली करिअर प्रोफेशनल्ससाठी AI & DS हा कोर्स उत्तम ठरेल. तसंच, मार्केटिंग कम्युनिकेशन्स, ब्रँड कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग,, मार्केटिंग अ‍ॅनालिटिक्स, कंझ्युमर रिसर्च आदी क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या अर्ली करिअर प्रोफेशनल्ससाठी DM & MC हा कोर्स उत्तम ठरेल.

अशी असेल पात्रता AI & DS साठी इच्छुक असलेल्यांनी कम्प्युटर सायन्स/आयटी/मॅथेमॅटिक्स/स्टॅटिस्टिक्स/इकॉनॉमिक्स आदींपैकी कोणत्याही किमान एका विषयातला कोर्स अंडरग्रॅज्युएट पातळीवर पूर्ण केलेला असावा.DM & MC साठी इच्छुक असलेल्यांनी कोणत्याही क्षेत्रातली किमान तीन वर्षांची अंडरग्रॅज्युएट डिग्री घेतलेली असणं आवश्यक आहे. दोन्ही कोर्सेससाठी इच्छुकांना ग्रॅज्युएशनला किमान 50 टक्के किंवा समकक्ष CGPA असणं गरजेचं आहे. तसंच, संबंधित क्षेत्रातला किमान 18 महिन्यांचा अनुभव 1 जुलै 2022पर्यंत घेतलेला असणंही गरजेचं आहे. अर्ज कसा करायचा? या शिक्षणक्रमांना अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया तीन टप्प्यांची आहे.

https://www.jioinstitute.edu.in/ ही अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन Apply Now या लिंकवर क्लिक करून आवश्यक ती डॉक्युमेंट्स अपलोड करावीत. तसंच, 2500 रुपये अ‍ॅप्लिकेशन शुल्क भरावं. ही प्रक्रिया केल्यानंतर Jio Institute Entrance Test (JET) देता येईल.

याला पर्याय म्हणून उमेदवार GRE Test चा स्कोअर देऊ शकतो. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ऑनलाइन पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. अंतिम निवड उमेदवाराच्या सर्वांगीण कामगिरीचा विचार करून केली जाणार आहे. JEE Advanced 2022: विद्यार्थ्यांनो, कधी होणार परीक्षा आणि कसा करावा अर्ज; वाचा देश-विदेशातले नामवंत तज्ज्ञ या दोन्ही शिक्षणक्रमांना शिकवणार आहेत.

गरजू, पात्र विद्यार्थ्यांना जिओ इन्स्टिट्यूटकडून ट्यूशन फीच्या 100 टक्के एवढी स्कॉलरशिपही दिली जाणार आहे, असं संस्थेकडून कळवण्यात आलं आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी संस्थेची वर दिलेली वेबसाइट पाहावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. ‘जागतिक दर्जाचे फॅकल्टी, इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स, स्कॉलरशिप्स आदींच्या साह्याने तरुणांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आमची मुळं भारतीय मूल्यांत आहेत आणि प्रभाव जागतिक आहे. अ‍ॅकेडमिक एक्सलन्स आणि इंडस्ट्री रेलेव्हन्स असलेले पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आम्ही सुरू करत आहोत,’ असं जिओ इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. दीपक जैन यांनी सांगितलं.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें