ज्ञानदीप प्रतिष्ठान गोवातफै जेष्ठ नागरिकांसाठी गुजरात यात्रा आयोजि
त करण्यात आली होती.

या तिर्थयात्रेत एकूण ४२ तीर्थयात्रीनी भाग घेतला ज्यामधे वरीष्ठ नागरिकांचा जास्त भरणा होता.
या यात्रेत द्वारकाधीश मंदिर, द्वारका बेट, द्वारका नागेश्वर, ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गिरनार, पोरबंदर येथील महात्मा गांधी जन्म स्थान, सुदामा मंदिर इत्यादी स्थळाना भेट दिल्या. बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ येथे सर्व यात्रीना स्वहस्ते श्री अभिषेक केला. श्री दत्त महाराज क्षेत्र गिरनार पर्वतावर तिर्थयात्री पैकी अमिता गदगकर ( वय ७७ ) व मालिनी चोडणकर ( वय ७२) या वरिष्ठ नागरिकांनी ५००० पायऱ्या चढून श्री चे दर्शन घेतले.
ज्ञानदीप प्रतिष्ठान ही संस्था जेष्ठ नागरिकांना तिर्थयात्रा घडवून आणण्यासाठी मागील काही वर्षापासून विना अपेक्षा सर्व प्रकारची मदत पुरविते. संस्थेचे प्रेरणा स्थान शिवोली येथील जीवनमुक्त मठाचे मठाधिश मुकुंदराव मडगावकर यांच्या आशिवादाने इतर ही क्षेत्रात संस्थेचे कार्य अविरतपणे चालू असते