हिंदूंची बळकावलेली सर्व मंदिरे परत मिळवण्यासाठी केंद्रीय कायदा करायला हवा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक

.

कुतुबुद्दीन ऐबकने कुतुबमिनार बांधला, हा धादांत खोटा प्रचार आहे, हे अनेक पुराव्यांच्या आधारे सिद्ध होऊ शकते. प्रसिद्ध इतिहासकार आदरणीय पु.ना. ओक यांनी केलेल्या संशोधनामुळे ‘ताजमहल’ नव्हे तर ‘तेजोमहालय’ असे आपण ठामपणे म्हणू शकतो. शाहजहानने ताजमहाल बनवला, याचे काहीही पुरावे नाहीत. इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची हजारो मंदिरे तोडली, तसेच बळकावली. एक-एक मंदिरासाठी 30-35 वर्षे न्यायालयीन लढा देण्यापेक्षा संसदेत हिंदूंची मंदिरे परत मिळवण्यासाठी एक कायदा करायला हवा. हिंदुत्ववादी पक्षाचे बहुमत असल्याने हे सहज शक्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक तथा अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ताजमहल नव्हे ‘तेजोमहालय’, कुतुबमिनार नव्हे ‘विष्णुस्तंभ’ !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादत बोलत होेते.

भारतीय पुरातत्व विभागाने 1970 पासून आजपर्यंत इंटॅक आणि आगाखान कमिटी यांच्या अधीन राहून काम केले. दुसरीकडे पाठ्यपुस्तकांतून खोटा इतिहास हिंदूंच्या माथी मारला. आमच्या मंदिरांच्या आणि इतिहासाच्या स्मृती काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केला गेला. सरकारने हिंदूंच्या ऐतिहासिक वारसे आणि मंदिरे यांचे संशोधन करून ते सर्वांसाठी खुले करायला हवे; मात्र देशातील पुरातत्त्व विभागही राजकारणात अडकला आहे. अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनामुळे अनेक हिंदू वास्तू ज्या मुसलमान आक्रमकांनी ताब्यात घेतल्या आहेत, त्या आजही तशाच आहेत, असे प्रतिपादन ‘दौपदी ड्रीम ट्रस्ट’च्या संस्थापिका नीरा मिश्रा यांनी केले.

या वेळी ‘दिल्ली उच्च न्यायालया’तील अधिवक्ता अमिता सचदेवा म्हणाल्या की, आज जी धार्मिक स्थळे इस्लामी शासकांनी उभारल्याचे सांगितले जात आहे, ती प्रत्यक्षात हिंदूंची प्राचीन धार्मिक स्थळे आहेत. हे बहुतेक हिंदूंना ठाऊकच नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये याविषयी जागृती करायला हवी. आज मंदिरांमधील पैसा सरकारी भ्रष्टाचारासाठी वापरला जात आहे. याला हिंदूंनी विरोध करायला हवा. कुतुबमिनार हे हिंदू आणि जैन यांची 27 मंदिरे पाडून बनवण्यात आली आहे, असे भारतीय पुरातत्त्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें