जैवविविधता संवर्धनासाठी उत्तर गोव्यातून पुरस्कारासाठी पौबुफा वडावली जैवविविधता व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.

.
जैवविविधता संवर्धनासाठी उत्तर गोव्यातून पुरस्कारासाठी पौबुफा वडावली जैवविविधता व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद विज्ञान संस्थेच्या डॉ. कासिम सभागृहात झालेल्या दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त गोवा राज्य जैवविविधता दिनानिमित्त बोड॑ आयोजित हया सोहळ्यात मानपत्र, चांदीचे मानचिन्ह व ५० हजाराचे बक्षीस देऊन समितीला गौरविण्यात आले
पुरस्कार स्वीकारताना समितीचे अध्यक्ष प्रभाकर हळर्णकर सरपंच प्रितेश नागेशकर पंचायत सचिव दिनेश चोडणकर, जैवविविधता समितीचे माजी सचिव आलवीटो डिसीलवा सदस्य व माजी सरपंच विनय चोपडेकर सदस्य संतोष मापारी व सुर्या हडफडकर हजर होते
यावेळी व्यासपीठावर एन आय. ओ
चे संचालक सुनील कुमार सिंग, विमान उड्डाण संचालक सुरेश शानभोग पर्यावरण डॉ. प्रवीण कुमार व गोवा राज्य जैवविविधता बोड॑ चे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम उपस्थित होते. प्रदीप सरमोकादम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर दशरथ रेडकर यांनी आभार मानले शानभोग यांनी जैवविविधता संवर्धन साठी कार्यरत असल्याने कौतुक करताना या कार्याची दखल घेऊन प्रसारमाध्यमांनी योग्य स्थान देण्याचे आवाहन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें