हरमल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 29 व्या उत्सव 2022-23 सालासाठी दिगंबर कोरकणकर यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष हरेश मयेकर होते.
उत्सव कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सुखानंद नाईक, अभय नाईक,भरत वस्त,सचिव चंद्रहास दाभोलकर, उपसचिव प्रकाश नाईक,खजिनदार विठ्ठल (आपा) वायंगणकर,उपखजिनदार राघोबा गावडे सल्लागार हरेश मयेकर,रामचंद्र केरकर, दत्ताराम मेथर,राघू गावडे,दादू गडेकर यांची निवड झाली.यावेळी उपसमित्यांची निवड केली. कार्यक्रम समिती अध्यक्ष देवानंद कुडव, सदस्यपदी मनोज कोरकण- कर,रघुनाथ वस्त,उदय बानकर, संजय नाईक,प्रकाश नाईक रामजी,प्रकाश तु नाईक, सुदेश माज्जी,लक्ष्मण माज्जी,दत्ताराम (भाऊ) पेडणेकर, राजन वायंगणकर,क्रीडा समिती अध्यक्ष सुशांत नाईक सदस्यपदी महादेव गावडे,प्रकाश कोरकण- कर,भावेश गडेकर,नागेश गावडे,राजू गावडे, साईदास नाईक,यशवंत नाईक,प्रदीप नाईक व प्रणव परब तर विसर्जन समितीच्या अध्यक्षपदी प्रविण वायंगणकर यांची निवड झाली.या बैठकीत मागील आमसभेतील दोन ठरावावर खुली चर्चा होऊन सदरचे ठराव फेरमंजुर केले व यंदापासून कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वसमंतीने घेण्यात आला.या बैठकीत मावळते सचिव अर्जुन गडेकर यांनी जमा खर्चाचा अहवाल सादर केला.प्रारंभी माजी अध्यक्ष हरेश मयेकर यांनी स्वागत केले व बैठकीत मंडळाच्या उत्कर्षासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत दिलीप वस्त,अरुण बांधकर,संतोष कोरकणकर,महादेव गावडे,कल्पेश नाईक,विनायक वस्त,भाऊ गडेकर,राजू गावडे आदींनी भाग घेतला.शेवटी अध्यक्ष दिगंबर कोरकणकर यांनी आभार मानले.यंदाची श्री गणेशमूर्ती व देखावा श्री राघू गावडे व कुटुंबीयांनी अर्पण केला आहे.