म्हापसा वाताहार
दहावी, बारावी नंतर कुठले क्षेत्र निवडावे याचे मार्गदर्शन योग्य वेळी न मिळाल्याने बरेच विधाथी चुकीचे क्षेत्र निवडतात आणि नंतर त्याना पश्चात्ताप होतो असे उदगार भालचंद्र आमोणकर यांनी काढले
कोलवाळ येथील डायगो वाझ उच्च माध्यमिक विद्यालय व जायंटस् गृप ऑफ थिवी यांनी आयोजित केलेल्या करीयर मार्गदर्शन या विषयावर ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उच्च माध्यमिक विद्यालय च्या प्रिन्सिपल माधवी हळर्णकर, जायंटस् गृप ऑफ थिवी चे सदस्य केशव देशपांडे, श्रीराम विधामंदीर च्या मुख्याध्यापिका जोनीता मोंतेरो, गणपत रायकर, विश्राम पालयेकर, जायंटस् गृप थिवी चे सदस्य सतीशचंद्र पास्ते, आदि उपस्थित होते.
विधाथीना मार्गदर्शन करताना आमोणकर यांनी सांगितले की आपल्या आईवडिलांची निवड आपल्या हाती नसते पण आपलं करीयर कोणते निवडावे हे मात्र निश्चितच ठरवू शकतो. त्यांनी विधाथीना भविष्य त कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनी खोजुवैकर यांनी केले तर सतीशचंद्र पास्ते यांनी आभार मानले.