बादैश पतंजली योग समिती व जोगर असोसिएशन पेडे यांच्या सहयोगाने आषाढी एकादशी दिवशी पेडे स्पोर्ट्स मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सुशांत हरमलकर, सहायक संचालक विवेक पवार, डॉ समीर सडेकर डॉ अरुंधती सडेकर राघव शेट्टी, योग शिक्षक संदीप मोरजकर, बादैश पतंजली योग समिती अध्यक्ष अशोक साळगावकर, सचिव सिद्ध ेश राऊत, भाजप मंडळ अध्यक्ष विनय चोपडेकर, पुजा मंगेशकर, सनी, सुधीर रिवणकर, नागेद्र, श्री वाणी, गोविंद गणपुले, तसेच योग शिक्षक जे. एस. ए. पदाधिकारी, हितचिंतक उपस्थित होते
यावेळी पेडे स्पोर्ट्स परीसरात १५० नारळाची रोपटी तसेच काजू , तीखी, जांभूळ, शेगुल, कडीपत्ता अशा प्रकारची रोपटी लावण्यात आली