*म्हापसा येथे हिंदूराष्ट्र संघटन बैठक*
म्हापसा, 16 जुलै – हिंदु जनजागृती समितीने हिंदूराष्ट्र स्थापनेच्या अनुषंगाने मरड, म्हापसा येथील तुळशीराम सभागृहात 17 जुलै या दिवशी दुपारी 3 वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे.
गोव्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या इन्क्विझिशनच्या छळात निरपराध हिंदूंना, तसेच नवख्रिस्तींना शिक्षा देण्यासाठी वापरलेला ‘हात कातरो खांब’ आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. गोमंतकीय जनतेच्या पूर्वजांनी इन्क्विझिशनच्या काळात भोगलेल्या छळाचा एकमात्र पुरावा असणार्या जुने गोवा येथील ‘हात कातरो खांबा’कडे पुरातत्त्व विभागाकडून पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. ‘हात कातरो खांबा’चे जतन, संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यीकरण या उद्देशांनी या बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे