मुलांना कृतिशील शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच जर त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला तर त्यांच्या लक्षात राहणे सोपे जाते. तर असेच कृतीतून शिक्षण देण्याच्या उद्देशाने डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालय, अस्नोडा, येथील इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्ग अनिश्का नाईक व प्रज्वल साळगांवकर यांनी सायन्स क्लब उपक्रमांतर्गत हातमागाचा अनुभव घेण्यासाठी अस्नोडा स्पोर्ट्स क्लब येथे नेण्यात आले. प्ले वे मेथड, लर्निंग बाय डुइंग, एक्सपोझिटरी पद्धती, रचनावादी दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा धडा म्हणजे धाग्यापासून कपडा तयार करण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो याचा अनुभव घेतला. आणि विद्यार्थ्यांना धागा, फायबर, फॅब्रिक, चरखा, हातमाग या संकल्पना समजल्या.
त्यांनी या भेटीचा खरोखर आनंद घेतला आणि एक चांगला अनुभव घेतला.