माणूस त्याच्या कार्यामुळे मोठा होतो- प्रा. कुलदीप कामत.

.

माणूस त्याच्या कार्यामुळे मोठा होतो- प्रा. कुलदीप कामत.

माणूस पदामुळे नव्हे तर त्याच्या कार्यामुळे मोठा होतो कार्यातच आनंद शोधायचा असतो आणि असे आनंददायी कार्य करण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे आपल्याला मिळते, असे उद्गार विद्या प्रबोधिनी शिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक कुलदीप कामत यांनी काढले. ते हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व युथ रेड क्रॉस च्या शपथविधी सोहळ्या वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापिका व हरमल पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता पार्सेकर, हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंदराज देसाई, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी धर्मा वस्त, विद्यार्थी मंडळाचे चेअरमन स्वप्निल शेटगावकर, युथ रेड क्रॉस च्या समन्वयक सौ गीता कानोजी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी प्रास्ताविक केले प्रशांत गावकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर विद्यार्थी कु व कु यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व युथ रेड क्रॉस च्या प्रतिनिधींचा परिचय करून देण्यात आला प्रमुख पाहुणे प्राध्यापक कुलदीप कामत यांनी तदनंतर
कु.सोहम रेडकर (सचिव, विद्यार्थी मंडळ),
कु.राहुल वॉल्टर (सांस्कृतिक सचिव )
कु. लक्ष्मण उर्फ देवांग बाबरेकर (राष्ट्रीय सेवा योजना नेता)
कु. अजय साळगावकर (युथ रेड क्रॉस मुख्य प्रतिनिधी) कु. जॉर्डन फर्नांडिस (क्रीडा सचिव, युवक) कु. साधना अश्वेकर (क्रीडा सचिव युवती) यांना शपथ दिली. शपथ ग्रहण केलेल्या सर्व प्रमुखांनी मग आपल्या सहका-यांना शपथ दिली. सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना यावेळी त्यांच्या पदाची सन्मान चिन्हे प्रदान करण्यात आली.
आदर्श नागरिक बनणे ही काळाची गरज आहे व आदर्श नागरिकांतून आदर्श नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे, असे विचार हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थी मंडळ सचिव कु. सोहम रेडकर यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना व युथ रेड क्रॉस च्या गीत सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मंडळाचे चेअरमन स्वप्निल शेटगावकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी मंडळाच्या समन्वयक नम्रता नाईक, एन.एस.एस. चे केशव नाईक, सनील पार्सेकर, सुवर्णा परब, सुगंधा शिरोडकर, चित्रा शेट्टीकर, श्याम च्यारी व इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे विशेष सहाय्य लाभले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें