“गौरव हा नेहमी प्रेरणादायी”
प्रमुख अतिथी पणशीकर यांचे प्रतिपादन
पार्से हायस्कूल पार्से पालक शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे मार्च २०२२ मध्ये शालांत मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत विशेष श्रेणी प्राप्त अकरा विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व पालक प्रबोधन शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी पार्से हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भगवती हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. केशव पणशीकर व प्रमुख वक्ते डॉ. रुपेश पाटकर शाळा समितीचे सदस्य अजय कळंगुटकर, शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत नाईक, संघाध्यक्ष अरुण पार्सेकर , उपाध्यक्ष सीमा भिसाजी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व पाहुण्यांचा परिचय श्रीकांत नाईक यांनी केला. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गौरवातून सदैव प्रेरणा घेऊन आपली जीवनाची वाटचाल, सर्व अडथळे पार करावयाचे आहेत. अहंकार न बाळगता पुढे जा असेही पणशिकर पुढे म्हणाले.
प्रमुख वक्ते डॉ. रुपेश पाटकर यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास जीवनात उत्तुंग यश मिळवता येते. जीवनाचे ध्येय निश्चित केल्यास आपण जीवनात नैपुण्य मिळवणे शक्य आहे. पालकांनी मुलांमध्ये संयम व श्रद्धा या दोन गोष्टी रुजवल्यास सुसंस्कृत नागरिक निर्माण होतील. मुलांना संयमाचे महत्त्व समजावून दिल्यास खरं ज्ञान त्यांना दिल्याचे श्रेय मिळेल. शेवटी समितीच्या खजिनदार स्वप्नाली शिरोडकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मंगेश कानोळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक सिद्धेश हरमलकर व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास पालक, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.