*हिंदु जनजागृती समितीचा ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा

.

 

 

*हिंदु जनजागृती समितीचा ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ उपक्रमांतर्गत विविध विद्यालयांमध्ये जागृती*
म्हापसा, १ ऑगस्ट – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असतांना हातातील राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, अत्याचार सहन केले, प्रसंगी प्राणाचेही बलीदान दिले. असे असतांना मुलांना खेळण्यासाठी घेतलेले, वाहनांवर लावलेले कागदी आणि प्लास्टिकचे ध्वज, रस्त्यावर आणि नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, पायदळी तुडवले जातात. यामुळेही राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे विद्यार्थ्यांच्या मनावर आताच बिंबवायला हवे. अनावधानेही राष्ट्रध्वजाचा अवमान तथा विटंबना विद्यार्थ्यांकडून होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने शिवोली परिसरातील विविध विद्यालयांच्या व्यवस्थापनला केले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. विद्या दाभोलकर, सौ. मधुरा हळदणकर आणि सौ. नुतन पेडणेकर यांचा समावेश होता.
या वेळी किर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुदेश कोचरेकर, श्री वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरज चोडणकर आणि सडये-शिवोली येथील श्री शांता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सागाळे यांना हे निवेदन देण्यात आले. श्री शांता विद्यालयाला निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये शिवोली येथील श्री खप्रो रवळनाथ मंदिराचे अध्यक्ष श्री. विनोद गोलतेकर आणि सौ. नविता गोलतेकर यांचा समावेश होता. हिंदु जनजागृती समितीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, आजचे विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे. ही भावी पिढी राष्ट्राभिमानी व्हावी, या उदात्त हेतूने हिंदु जनजागृती समिती गेली 19 वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, पत्रके वाटणे, फ्लेक्स लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री रोखणे आदी कृती करत आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें