तरुणांनी देशहिताच्या प्राधान्य द्यावे : निवृत्त सी आर पी एफ हवालदार सुभाष नागोजी
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. या काळात भारताने चौफेर प्रगती केली. पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देशाने मुक्त श्वास घेतला त्याचाच आम्ही अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अमृत हेअमरत्व प्राप्त करून देणारे रसायन असून भारतीय तरुण मनाने चिरतरुण व्हावे व त्यांनी देशाच्या सेवेसाठी प्राधान्यक्रम द्यावा. असे झाल्यास उज्ज्वल भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकेल, असे उदबोधक विचार केंद्रीय आरक्षित पोलीस ( सी आर पी एफ ) दलातील निवृत्त हवालदार आणि केरी पेडणे गावचे सुपुत्र सुभाष नागोजी यांनी केरी येथें मांडले.
न्यु इंग्लिश हायस्कुलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने नागोजी व्यसपठावरून बोलत होते.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक तातोबा तळकर, विनोद नाईक, विनायक गाड, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गंगाराम मठकर , मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर हे मान्यवर सुभाष नागोजी यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शालेय विद्यार्थ्यानी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित विद्यार्थी व पालकांचे मनोरंजन केले. वेदांत तळकर, दीपक गाड, रोहित , विनायक गोवेकर, आणि बालभवन पेडणे केंद्र आयोजित देशभक्ती गीत गायन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त मुलांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. याचे निवेदन नीलम महालदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व परिचय सत्यवान हर्जी यांनी केले. तर निषिता आकरकर यांनी सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रदर्शन केले.
फोटो: केरी पेडणे येथे तालुका व राज्य स्थारिय स्पर्धात यश मिळवलेल्या विद्यार्थ्याना बक्षिसे देताना निवृत्त लष्करी सैनिक सुभाष नागोजी.सोबत इतर मान्यवर.