गोशामहल (तेलंगणा) येथील आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी !*

.

_*

 

*हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी*

*गोशामहल (तेलंगणा) येथील आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी !*

पणजी, 7 सप्टेंबर – तेलंगाणा येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना 23 ऑगस्ट दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात त्यांना पुन्हा 25 ऑगस्ट या दिवशी अटक करण्यात आली. आमदार टी. राजासिंह यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच ‘सर तन से जुदा’सारख्या प्रक्षोभक आणि जिवे मारण्याच्या घोषणा देत हिंसक आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवणे आणि त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. केदार नाईक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर महासंघाचे सर्वश्री जयेश थळी, वीर सावरकर प्रतिष्ठानचे अरुण नाईक, हिंदु जनजागृती समितीचे सुशांत दळवी आणि राज बोरकर यांचा समावेश होता.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंदु देवदेवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका करणारे हिंदुद्वेषी कथित विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी यांच्या तेलंगाणा येथील कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार टी. राजासिंह यांनी सातत्याने केली होती; मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत पोलीस संरक्षणात त्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर टी. राजासिंह यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यानंतर जिहादी प्रवृत्तीचे आमदार, पदाधिकारी यांच्याकडून थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समिती मागणी करत आहे की, कायदा सुव्यवस्था बिघडवू पहाणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. टी. राजासिंह यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावे. टी. राजासिंह यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना सुरक्षित तुरुंगात हलवावे. टी. राजासिंह यांच्यावर जुन्या प्रकरणाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा कुटील डाव रचला जात असल्याने केंद्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना न्याय द्यावा. या निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि तेलंगाणा राज्याचे राज्यपाल यांना पाठवण्यात आली आहे.

*आपला नम्र,*
*डॉ. मनोज सोलंकी,*
*राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती*
*(संपर्क क्र.: 9326103278)*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें