म्हापसा भगिनी मंडळ आयोजित कविता स्पर्धेत अनुराधा,शिवानंद,माणिक,रेखा व संजय विजेते

.

म्हापसा भगिनी मंडळ आयोजित कविता स्पर्धेत अनुराधा,शिवानंद,माणिक,रेखा व संजय विजेते
**************************************
भगिनी मंडळ म्हापसा व गणेश विश्वस्त मंडळ गणेशपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविता सादरीकरण स्पर्धा एकवीस दिवसीय गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी संपन्न झाली.एकूण तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धा म्हापसापुरती मर्यादित असूनही भरघोस प्रतिसाद लाभला..स्वरचित वा पाठ्यपुस्तकातिल व प्रसिद्ध कवींच्या कविता वाचून,गाऊन,तोंडपाठही सादर केल्या गेल्या.स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका रिचा शिरोडकर व मोहना हळर्णकर यांनी केले.अनुराधा कवळेकर प्रथम क्रमांक पटकावित अव्वल ठरल्या .शिवानंद साळगांवकर द्वितीय स्थानी व माणिक शिरोडकर तिसर्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या.पहिले उत्तेजनार्थ रेखा महालेनी पटकाविले तर दूसरे उत्तेजनार्थ संजय शेट्येला मिळाले .
बक्षिसवितरण गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत,विश्वस्त मंडळ गणेशमंदिराचे अध्यक्ष सत्यवान भिवशेट ,भगिनी मंडळाच्या अध्यक्षा नीता नाटेकर प्रभागाच्या नगरसेविका डाॅ.नूतन बिचोलकर व दोन्ही परीक्षकांच्या हस्ते पार पडले.
वरील सर्वांच्या हस्ते समई प्रज्वलन होऊन नीता नाटेकरांच्या स्वागतपर, भाषणाने स्पर्धेस प्रारंभ झाला.अनिल सामंत बक्षिसवितरण कार्यक्रमात सादर झालेल्या कवितांबद्दल व स्पर्धकांच्या सादरीकरणाबद्दल मुद्देसूद बोलताना उत्तमप्रकारे स्पर्धेचं आयोजन म्हापसा भगिनी मंडळाने केल्याचे सांगत मिळालेला भरघोस प्रतिसाद व सादरीकरणाचा स्तर फारच उत्तम असल्याचे सांगितले.पाठ्यपुस्तकातिल कविता या जणएकल्याच्या मर्मबंधातली ठेव असल्याचे सांगत या सर्व स्पर्धकांचे कविसंमेलन आयोजित करायची सूचना त्यानी केली.कार्यक्रमाचे आयोजन नेटके झाल्याचे सांगत त्यांनी सर्व स्पर्धकांचे तोंडभरून कौतुक केले.नीता नाटेकरांनी मुलांसाठी बालदिनी भगिनीमंडळाचा अशीच कवितास्पर्धा आयोजित करण्याचा मानस बोलून दाखविला. सत्यवान भिवशेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या सगळ्यांची प्रशंसा करत असले साहित्यिक कार्यक्रम व्हायला हवेत म्हणाले.नगरसेविका नूतन बिचोलकर सबंध वेळ कार्यक्रमात उपस्थिती लाऊन समयोचित बोलल्या.विश्वास पिळणकरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.एकूण कवितास्पर्धा , उद्घाटन समारंभ तसेच बक्षिसवितरणाचे सूत्रसंचालन सुरेंद्र शेट्ये यांनी केले.भगिनी मंडळाच्या सचिव माजी नगराध्यक्षा रूपा भक्तांनी आभारप्रदर्शन केले.कवयित्री अनघा नेरूरकरनी खास कविता सुरवातीलाच सादर करून स्पर्धेत रंग भरले तर अनुक्रमे पंचाहत्तर,ऐंशी व पंचाऐंशी वर्षांच्या अनुराधा कर्पे,माया गाड,माणिक शिरोडकर व मंदाकिनी नानोडकरांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची शान वाढविली.भगिनी मंडभगिनी मंडळाच्या सुनिता कळंगुटकर,किरण ककैया ,सुवर्णा मळीक यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.रसिक कविताप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें