2 ऑक्टोबर रोजी इनर व्हील क्लबने बायकांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त फुगडी स्पर्धा आयोजित केली .त्याला उत्स्फूर्तपणे पांच मंडळानी भाग घेतला . पारंपारिक वेशभुषेत स्वतः गाऊन गरबा- दांडियालाही लाजवेल अशा जोशपूर्ण फुगड्या घातल्या व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
इनर व्हील चा उद्देश की फुगडी ही लुप्त पावलेल्या कलेला प्रोत्साहन देण आणि महिलांना व्यासपीठा उपलब्ध करून देणे.
पहिले बक्षीस श्री देव Bodgeshwar फुगडी मंडळ, Mapusa, तर दुसरे बक्षीस श्री हनुमान फुगडी गट, pirna, तिसरे बक्षीस मोरेश्वर महिला कला संघ, tulaskarwadi, Pernem यांना मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस श्री munjeshwar कला आणि सांस्कृतिक मंडळ, पेडे, Karaswada and श्री साई श्रद्धा कला मंडळ यांना मिळाला.
पहिली दोन बक्षिसे इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा स्मिता गंवडळकर यांनी तर तिसरे बक्षीस रुपाली गंवडळकर यांनी आपल्या वडिलांचा स्मरणार्थ प्रायोजित केले. उपस्थित नगरसेविका व प्रमुख पाहुण्या डाॅ. नूतन डिचोलकर यांनी उरलेल्या दोन मंडळाना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रायोजित केली. रुपाली गंवडळकर व हेमश्री गडेकर यांनी परिक्षण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्षा रुपा भक्ता यानी केले.