किम्बर्ली-क्लार्कने हगीज नेचर केयर™ ही आपली प्रीमियम डायपर श्रेणी भारतात पुन्हा सादर केली

.

किम्बर्ली-क्लार्कने हगीज नेचर केयर™ ही आपली प्रीमियम डायपर श्रेणी भारतात पुन्हा सादर केली

राष्ट्रीय, 16 फेब्रुवारी 2023: किम्बर्ली-क्लार्कने हगीज नेचर केयर™ ही आपली प्रीमियम डायपर श्रेणी भारतातील ग्राहकांसाठी पुन्हा सादर केली आहे. चटकन लक्ष वेधून घेईल असे नवे पॅकेजिंग डिझाईन असल्यामुळे आपल्या बाळांसाठी हगीज नेचर केयरची निवड करणे आता अजून जास्त सोपे बनले आहे. आपल्या मुलांसाठी ऑरगॅनिक उत्पादने निवडण्याकडे सध्या पालकांचा कल वाढत आहे. आपल्या बाळांसाठी डायपर निवडत असताना ग्राहक जो विश्वास ठेवतात तो अधिक जास्त दृढ व्हावा या उद्देशाने हगीजने नवी हगीज नेचर केयर™ श्रेणी प्रस्तुत केली आहे.

या रिलॉन्चसाठी एक खास डिजिटल फिल्म देखील ब्रँडने प्रकाशित केली आहे. बाळाची त्वचा निरोगी राहावी यासाठी ब्रँड वचनबद्ध असल्याचे या फिल्ममध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. बाळाची त्वचा अतिशय नाजूक व संवेदनशील असते हे नीट समजून घेऊन तिला सर्वोत्तम सुरक्षा देण्यात मदत करण्याच्या दृष्टीने नवी हगीज नेचर केयर™ श्रेणी तयार करण्यात आल्याचे या फिल्ममध्ये प्रभावीपणे मांडले गेले आहे.

ग्राहक संशोधनानुसार, बाळाला डायपर रॅशेस होऊ नयेत यासाठी माता प्रथम पसंती हगीज नेचर केयर™ला देतात, दर दहापैकी आठ माता हगीज नेचर केयर™च्या ऑरगॅनिक कॉटन आणि “नो नॅस्टीज” सुरक्षेला प्राधान्य देतात, नव्या श्रेणीमधून ही सुरक्षा प्रस्तुत केली जात आहे कारण या डायपरमध्ये पॅराबेन्स, क्लोरीन आणि लेटेक्स अजिबात नाहीत.

वयस्क व्यक्तींच्या तुलनेत बाळांची त्वचा ३०% पातळ असते, सहाजिकच ती अधिक जास्त नाजूक असते, डायपर रॅश किंवा त्वचेचे इतर त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते. या समस्येवर उपाय म्हणून हगीज नेचर केयर™ने आपल्या प्रीमियम रेन्जमध्ये १००% ऑरगॅनिक कॉटन लायनर वापरले आहे, जे बाळांच्या त्वचेला अनुरूप असे सौम्य आहे आणि डायपर रॅशेस येऊ देत नाही.

१२ तास शोषून घेण्याची क्षमता असलेल्या नवीन हगीज नेचर केयर™मध्ये हवा खेळती राहते, यामुळे डायपर रॅश होण्यास प्रतिबंध घालण्यात मदत होते हे क्लिनिकली सिद्ध झाले आहे, सहाजिकच बाळाची त्वचा सुकी आणि व्यवस्थित राहते. बाळासाठी हे खूप आरामदायी ठरते. आपल्या बाळांसाठी सर्वोत्तम उत्पादने वापरली गेली पाहिजेत याबाबत विशेष जागरूक असलेल्या मातांनी या डायपरना प्राधान्य दिले आहे.

किम्बर्ली-क्लार्क इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर श्रीमती साक्षी वर्मा मेनन यांनी सांगितले, “बाळांना सर्वोत्कृष्ट गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी आम्ही हगीजमध्ये अथक प्रयत्नशील असतो. आमच्या ग्राहक सर्वेक्षणात आढळून आले की माता आपल्या बाळांसाठी ऑरगॅनिक कॉटनला पसंती देतात आणि त्यामुळे याची मागणी वाढत आहे. म्हणूनच आम्ही हगीज नेचर केयर ही ऑरगॅनिक कॉटनपासून बनवलेल्या प्रीमियम डायपर्सची श्रेणी तयार केली. आमच्या नव्या कॅम्पेनमध्ये एक डिजिटल फिल्म सादर करण्यात आली आहे ज्यामध्ये या नव्या श्रेणीची वैशिष्ट्ये आणि ती बाळाच्या त्वचेसाठी किती अनुरूप व आरामदायी आहेत ते सांगितले गेले आहे. “वी गॉट यु, बेबी” या आमच्या जागतिक संदेशाला अनुसरून हे कॅम्पेन तयार करण्यात आले आहे. आईच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व बाळाच्या नाजूक त्वचेला पुरेपूर संरक्षण पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.”

या फिल्मबाबत ओगिल्वी इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर श्री. सुकेश कुमार नायक यांनी सांगितले, “आजच्या काळातील मातांना मूलभूत गोष्टींवर समाधान मानायचे नाही, त्यामुळे त्यांच्या बाळांना देखील ते चालणार नाही. आणि म्हणूनच या उत्पादनातून त्यांना काय-काय मिळत आहे व त्याची माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोचवायची आहे याचा दर्जा देखील उंचावणे आमच्यासाठी आवश्यक होते. आणि म्हणूनच हगीज नेचर केयर लॉन्च करण्यासाठी आम्ही एक वेगळा दृष्टिकोन वापरला आहे. वी गॉट यु, बेबी हे कॅम्पेन म्हणजे जागरूक व चोखंदळ माता आणि बाळांसाठी हगीजने दिलेले आश्वासन आहे की हे बाळांच्या नाजूक त्वचेसाठी अनुकूल असे सर्वात सौम्य डायपर आहेत. हे डायपर आरामदायी आणि चांगले असल्याचे दर्शवणारे बाळाचे हास्य पाहायला अजिबात विसरू नका.”

सर्व ऑफलाईन स्टोर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर हगीज नेचर केयर श्रेणी खरेदी करता येईल.

फिल्म पाहण्यासाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=zHusZmQWtos

About Huggies
From the house of Kimberly-Clark, Huggies has been helping parents provide love, care and comfort to their babies, for more than 25 years. From creating innovative everyday products, to strong hospital programs, to partnering with real mothers to develop diapers and wipes, Huggies promises to ensure all babies get the care they need to thrive. For more information on Huggies India, please visit https://www.huggies.co.in/en-in/

For more information, please contact:
Preeti Binoy
Head – Corporate Communications and Government Affairs (India)

Tel: +91-22-3322 0027 | +91-9769137505
Email: preeti.binoy@kcc.com
Azka Shaikh
Adfactors PR

Tel: +91 9920120645
Email: azka.shaikh@adfactorspr.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें