स्‍कोडा ऑटोकडून भारतात ब्रॅण्‍डला अधिक विकसित करण्‍यासाठी सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित* नॅट्रॅक्‍स, इंदौर येथे ‘सेफर विथ स्‍कोडा’ ट्रॅक डे चे आयोजन

.

*स्‍कोडा ऑटोकडून भारतात ब्रॅण्‍डला अधिक विकसित करण्‍यासाठी सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित*

नॅट्रॅक्‍स, इंदौर येथे ‘सेफर विथ स्‍कोडा’ ट्रॅक डे चे आयोजन

स्‍कोडा ऑटो इंडियाने आपल्‍या ग्राहकांच्‍या सुरक्षिततेसंदर्भात गती कायम ठेवण्‍याची घोषणा केली. जागतिक स्‍तरावर स्‍कोडा ऑटोचा क्रॅश टेस्‍ट्स व सुरक्षिततेसह ५० वर्षांचा वारसा आहे. स्‍कोडा १०० एल पूर्वीच्‍या झेकोस्लोव्हाकियामधील प्राग-रुझिने येथे प्रथम दस्तऐवजीकरण केलेली क्रॅश चाचणी आहे. सध्या, कंपनीचे उहेल्न्सि येथे जागतिक दर्जाचे, अत्याधुनिक पॉलिगॉन चाचणी केंद्र आहे, ज्‍याला ऑटोमोटिव्‍ह टेस्टिंग टेक्‍नॉलॉजी इंटरनॅशनल ट्रेड जर्नलकडून वर्ष २०२० ची क्रॅश लॅबोरेटरी म्‍हणून पुरस्‍कारित करण्‍यात आले आहे. आणि २००८ पासून प्रत्‍येक जागतिक स्‍कोडा युरो एनसीएपीकडून ५-स्‍टार रेटेड आहे.
स्‍कोडाच्‍या सुरक्षिततेसदंर्भातील आंतरराष्‍ट्रीय विक्रमाबाबत स्‍कोडा ऑटोचे तंत्रज्ञान विकास मंडळाचे सदस्‍य जोहान्‍स नेफ्ट म्‍हणाले, ‘‘स्‍कोडामध्‍ये आम्‍ळी आमच्‍या वाहनांची सक्रिय व निष्क्रिय सुरक्षितता सातत्‍याने सुधारण्‍यासाठी तंत्रज्ञान विकासामधील आमच्‍या सर्व कौशल्‍याचा वापर करतो. आमचे एण्‍ट्री-लेव्‍हल मॉडेल्‍स देखील अनेक सहाय्यक सिस्‍टम्‍स देतात, ज्‍या फक्‍त उच्‍च वाहनवर्गांमधील वाहनांमध्‍ये उपलब्‍ध असतात. तसेच आमची अत्‍याधुनिक क्रॅश लॅबोरेटरी पॉलिगॉन उहेल्निस आमच्‍या मॉडेल्‍सच्‍या सुरक्षिततेची सखोलपणे चाचणी करण्‍याकरिता योग्‍य सेटिंग देते. यामुळे आम्‍हाला अगदी सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये वाहन विकासात आमच्‍या निष्‍पत्तींचा अवलंब करता येतो. २००८ पासून चाचणी करण्‍यात आलेल्‍या सर्व स्‍कोडा मॉडेल सिरीजच्‍या क्रॅश सुरक्षिततेसाठी एनसीएपी रिफरन्‍स टेस्‍ट व ग्‍लोबल एनसीएपी टेस्‍टमध्‍ये ५-स्‍टार्सचा सर्वोच्‍च स्‍कोअर संपादित करणे उल्‍लेखनीय यश आहे.’’
स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) भारतातील फोक्‍सवॅगन ग्रुपचे पॅसेंजर वेईकल ब्रॅण्‍ड्स – स्‍कोडा ऑटो, फोक्‍सवॅगन, ऑडी, पोर्श व लम्‍बोर्गिनी यांचे प्रतिनिधीत्‍व करते. ग्रुप भारतातील ग्राहकांना डिझाइन्‍स, बॉडी स्‍टाइल्‍स व पॉवरट्रेन्‍सची सर्वात इच्छित व व्‍यापक श्रेणी आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे सुरक्षितता देतो.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें