बिगर सरकारी सस्थाची रस्तावरील निराधार लोकांच्या पुनर्निर्वासन करण्यात महत्वाची भूमिका — डॉ प्रमोद साळगावकर
रस्तावरील निराधार लोकांचे पुनर्निर्वासन करण्यामागे बिगर सरकारी संस्था यांचं योगदान महत्वाचं आहे .सरकारी व्यवस्था जेथे कोलमडते किंवा अपुरी पडते तेव्हा बिगर सरकारी संस्थांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते आणि गोव्यात तसेच देशामध्ये बिगर सरकारी संस्था योग्य रीतीने लोकांची सेवा करीत आहे आणि अश्या संस्थामागे लोकांनी सहकार्य करून त्यांच्या पाठी मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे .असे प्रतिपादन डॉ प्रमोद साळगावकर हिने दोन दिवसाच्या रस्तावरील निराधार लोकांच्या समस्येवर आधारित परिसंवादाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले .
म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ प्रिया मिशाळ हिने सांगितले कि म्हापशा शहरातील निराधार लोकांना पुनर्निवसं करण्यात जीवन आनंद संस्थेला म्हापसा नगरपालिका पूर्णपणे पाठिंबा देईल व म्हापसा पूर्णपणे स्वच्छ करण्यात मदत करील असेच आश्वासन तिने दिले. जीवन आंनद संस्था आणि सारस्वत शिक्षण संस्थेचे काकुलो वाणिज्य महाविद्यालयाने संयुक्तपणे रस्तावरील निराधार लोकांच्या समस्येवर राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसांचे परिसंवाद याचे आयोजन केले होते . हा परिसंवाद १२ आणि १३ मे रोजी सारस्वत शिक्षण संस्थेच्या आनंद केणी सभागृहात यशस्वीपणे आयोजन केले..या परिसंवादात देशातील सहा राज्यातून सुमारे ३५ प्रतिनिधीनि भाग घेतला होता. या परिसंवादात रस्तावरील निराधार लोकांच्या असलेल्या अनेक समस्येवर चर्चा करण्यात अली .या परिसंवादात निराधार लोकांची समस्या , निराधार लोकांना मिळणाऱ्या सुविधा ,रस्तावरील निराधार लोकांशी काम करताना येणारी आव्हाने ,निराधार लोकांसाठी सरकारच लागणारा पाठिंबा आणि सहभाग ,निराधार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लागणाऱ्या साधन सुविधा व शेवटी राष्ट्रीय पातळीवर उपाय योजना अश्या विविध सत्रातून विषय मांडले व त्यावर सविस्तर पणे चर्च करण्यात आली. सगळ्याविषयावर चर्चा करून शेवटी राष्ट्रीय स्थरावर निराधार लोकांशी काम करण्याऱ्या बिगर सरकारी संस्थांची एक आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले. राष्ट्रीय आघाडी हा विशिष्ट्य समस्येवर राष्ट्रीय स्तरावर काम करील व निराधार लोकांच्या समस्या देशपातळीवर सोडवण्यासाठी काम करील. म्हापसा शझर सुंदर करण्यासाठी जीवन आनंद संस्था आपल्या परीने काम करीत आहे आणि जर त्यांना सरकारची मदत मिळाली तर निश्चितपणे म्हापशा शहरातील निराधार लोकांना आपल्या आश्रमात आधार देऊन शहर सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. या साठी सरकार पातळीवर मदत मिळणे गरजेचे आहे असे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक श्री संदीप परब यांनी व्यक्त केले .
समारोप सोहळ्यात व्यासपीठावर जीवन आनंद संस्थेचे संस्थापक श्री संदीप परब, श्री श्रीनिवास सावंत , प्राचार्य संतोष पाटकर उपस्थित होते . जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त सौ पूनम बुर्ये हिने सुत्रसंचलन केले तर संदीप परब यांनी आभार मानले.
या परिसंवादाचे उदघाटन सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे मुखमंत्री श्री प्रमोद सावंत उपस्थित होते .