*गोवाफेस्ट’मध्ये अर्थपूर्ण आणि परिवर्तनकारी कल्पना प्रकाशझोतात!*
*दुसरा दिवस : गीतसंगीत, अनेक चर्चासत्रे, ज्ञानसत्रे यांचे आयोजन; मान्यवरांचा सहभाग*
२५ मे २०२३ गोवा: गोव्यात उष्णतेने तीव्रतम पातळी गाठली असली तरी, ग्रँड हयात येथे ‘गोवाफेस्ट’च्या दुसर्या दिवशीच्या सत्रामुळे शीतलता आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका दिव्या कुमार आणि असीस कौर यांनी दिवसाच्या प्रारंभीच आपल्या स्वर्गीय सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येकाचे अंत:करण स्वरांनी आणि प्रचंड ऊर्जेने भारून गेले होते.
‘जोडलेल्या उपकरणांचे भविष्य आणि क्रॉस चॅनल मापन’ (फ्युचर ऑफ कनेक्टेड डिव्हाइसेस अँड क्रॉस चॅनल मेजरमेंट) या विषयावरील ‘इंडिया टुडे’ने आयोजित दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गीत लुल्ला – विक्रीचे व्हीपी आणि एशिया पॅसिफिक – कॉमस्कोर यांच्यासमवेत यावर चर्चा केली. पंकज कृष्णा – संस्थापक आणि सीईओ – क्रोम डीएम आणि सलील कुमार – सीईओ – आयटीजीडी यांनी तज्ज्ञ, जाणकार म्हणून विशेष उपस्थिती होती, तर इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. विविध विविध माध्यमातून स्मार्ट उपकरणांची एकमेकांसोबतची अखंड जोडणी, एकमेकांतील परस्पर सहज संवाद, डेटाचे आदानप्रदान आणि एकूणच उपकरणांच्या भविष्याविषयी या चर्चासत्रात गांभीर्याने चर्चा करण्यात आली. एकाच वेळी एकापेक्षा अधिक उपकरणांचे एकमेकांशी आदानप्रदान करणे, विविध प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्याचे वर्तन, क्रॉस-चॅनल मोजमापनाचे अधिकाधिक अत्याधुनिक बनणे या सर्व गोष्टी खूपच व्यापक बनल्या आहेत. गीत यांनी टिप्पणी केली की, क्रॉस चॅनल मेजरमेंट आता एका अखंड व सातत्य असलेल्या दृष्टिकोनाकडून खंडित दृष्टिकोनाकडे जात आहे, ज्याची वारंवार तक्रार करणे आवश्यक आहे. कारण डेटा स्वतःच अर्थहीन आहे, डेटाला संदर्भ आवश्यक आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पंकज यांनी जोडल्या जाणार्या विविध घटकांच्या व्याप्तीबद्दल आपले विचार मांडले. ब्राउझर (२२३ दशलक्ष), मोबाइल उपकरणे (६१९ दशलक्ष) आणि कनेक्टेड टीव्ही (२२.१ दशलक्ष) हे तीन घटक सर्वांत महत्त्वाचे आहेत. हे आकडे यापूर्वी कधीच उघड झाले नव्हते! सलील यांनीदेखील डेटाची उपलब्धता व उत्पन्न यावर भर दिला. चर्चासत्रातील वक्त्यांनी मोजमापाशी संबंधित स्पष्टतेवर जोर दिला, तसेच ही उपकरणे व घटक रिअल-टाइममध्ये वापरणार्या इकोसिस्टमच्या संदर्भात सहयोगावरही भाष्य केले.
नंतर, डिस्ने स्टारने ‘द इव्हॉल्व्हिंग इकॉनॉमी अँड द फ्यूचर ऑफ स्टार्टअप्स’ या विषयावर ज्ञान परिसंवाद आयोजित केला. या परिसंवादात राजन आनंदन, व्यवस्थापकीय संचालक – सेक्वॉइया कॅपिटल अँड सर्ज, यांच्याशी मुक्त पत्रकार अनुराधा सेनगुप्ता यानी संवाद साधला. या संवादाने अर्थव्यवस्थेच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. यात उत्तुंग यश गाठणार्या बिझनेस मॉडेलच्या स्टार्टअपसाठी आवश्यक असलेले घटक जसे की भांडवल, नावीन्य, चपळता आणि त्यातून मार्ग काढताना येणारे व्यत्यय यावर वक्त्यांनी मते व्यक्त केली.
स्टार्टअप्सचे भविष्य, जटिल आव्हाने सोडवण्याचे कौशल्य, नवीन बाजारपेठा निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावरही त्यांनी भर दिला.
‘सिक्विया कॅपिटल अँड सर्ज यांनी’ पाठिंबा दिलेल्या कंपन्यांनी ग्राहकांची उत्तम बाजारपेठ मिळवली आहे. वृद्धिंगत होणार्या कंपन्या स्वत:ला सिद्ध करत आहेत व येते काही वर्षांत त्यांचा नफा बर्याच मोठ्या प्रमाणात वाढेल, असे मत रंजन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, या कंपन्या पुढील ६ तिमाहीत नफ्याचे नवे उच्चांक गाठतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे!
यानंतर ‘सर्जनशील परिणामकारकतेत वृद्धी : आपल्या कॅम्पेनच्या क्षमतांचा विस्तार’ या विषयावर ‘द हिंदू ग्रुप’द्वारे समर्थित आणखी एक परिसंवाद झाला. यात एड पँक, व्यवस्थापकीय संचालक – डब्ल्यूएआरसी – यांनी सर्जनशीलतेच्या परिणामकारकतेवर अनेक विचार मांडले. सर्जनशीलता तुमच्या कॅम्पेनच्या परिणामकारकतेवर कमालीचा परिणाम करू शकते, असे मत त्यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले, आम्हाला केवळ ब्रँडच नव्हे तर रोजच्या लोकांसाठीही सर्जनशीलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अंतिम वापरकर्त्यांसाठी अनुभव तयार करणे महत्त्वाचे असले पाहिजे. सत्रात कॅम्पेनमधून सर्जनशील व कल्पकता वापरून जे सांगायचे आहे, ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यात प्रेक्षकांच्या चौकस प्रश्नांना उत्तरे देण्यात आल्यामुळे त्यांचाही सक्रिय सहभाग राहिला.
याव्यतिरिक्त, एड यांनी योग्य प्रकारच्या सर्जनशीलतेचा लाभ घेण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला. ज्यामुळे प्रेक्षकांना भुरळ घालणार्या आणि ब्रँडचा प्रभाव वाढवणारे, तल्लीन करणारे आणि संस्मरणीय कॅम्पेन तयार करणे सुलभ होईल. शिवाय, सर्वसमावेशक विपणन, दृकश्राव्य माध्यमातून संस्कृती आणि उपसंस्कृतींचा आधार घेत लोकांच्या काळजाला हात घालणे कसे शक्य होते व सर्जनशील प्रभावाशी संबंधित असलेल्या अत्यंत परिणामकारक भूमिका यावरही त्यांनी भाष्य केले.
दुसर्या दिवसाच्या पूर्वार्धात मॅडिसन वर्ल्डचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सॅम बलसारा यांच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ‘मीडिया प्लॅनिंग’ ने सुरू होणारे दोन मास्टरक्लास पाहायला मिळाले. ब्रँड मोहिमेसाठी डिजिटल मीडियाचा फायदा घेण्याची गरज का आहे याविषयी त्यांनी त्यांची अभ्यासपूर्ण मते सर्वांना सांगितली. यानंतर ’ड्रायव्हिंग रिलेव्हंट रीच थ्रू व्हिडिओ’, याविषयी प्रतीक उदेशी, ऍमेझोनच्या – एजन्सी आणि व्हिडिओचे प्रमुख – यांनी Aऍमेझोनवरील जाहिरातींवर व्हिडिओ सोल्यूशन्सद्वारे सर्व अपेक्षित ग्राहकांशी संपर्क साधणे आणि भारतातील प्रवेगक व्हिडिओ वापराच्या तुलनेत जाहिरातदार त्याचा कसा फायदा घेऊ शकतात, याविषयी विवेचन केले.