देशात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची शासनाकडे मागणी*

.

 

दिनांक : 8.6.2023

*देशात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची शासनाकडे मागणी*
पणजी, ८ जून – दिल्लीमध्ये साक्षी आणि झारखंडमध्ये अनुराधा अशा अनेक हिंदू मुलींची हत्या करणार्‍या धर्मांध लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवा, तसेच देशात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा करा, अशी मागणी करणारे ‘रणरागिणी’च्या वतीने उत्तर गोव्याचे अतिरिकत जिल्हाधिकारी श्री. संजीव गावस देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळामध्ये महिला स्वयंसाहाय्य गटाच्या सौ. वनिता चिमुलकर, हिंदुत्वनिष्ठ सौ. वंदना नाईक, सौ. शुभदा काणे व सौ. प्रतिभा हळदणकर, ‘रणरागिणी’च्या सौ. सोनम शिरोडकर आणि डॉ. कल्पिता गडेकर यांचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे, परदेशात विक्री करणे, वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे आदी गंभीर प्रकारांची असंख्य प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. यासाठी ‘रणरागिणी’ने निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत. प्रत्येक राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमणे, राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करणे, ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करणे आणि अशा प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली गुन्हे नोंद करणे, ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांचीही चौकशी करणे. लव्ह जिहाद प्रकरणांत मदरसे आणि मशिदी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांवर तत्काळ बंदी घालण्यात यावी.

आपली नम्र,
*सौ. राजश्री गडेकर, रणरागिणी*
(संपर्क क्रमांक – ७७७४८ ५१२५३)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें