_
दिनांक : २१.०६.२०२३
*कळंगुट येथे शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेण्यास भाग पाडणार्या शिवप्रेमींचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !*
फोंडा, २१ जून – कळंगुट येथे शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेण्यास भाग पाडणार्या शिवप्रेमींचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, फोंडा येथे आयोजित वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात २१ जून या दिवशी सायंकाळी सत्कार करण्यात आला. महोत्सवात सनातनचे संत सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ, शाल आणि भेटवस्तू देऊन शिवप्रेमींच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मटकर आणि उपाध्यक्ष श्री. प्रज्योत कळंगुटकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवस्वराज्य संघटनेचे सर्वश्री सुरेश मयेकर, सिद्धेश गोवेकर आणि प्रसाद शिरोडकर यांची या वेळी उपस्थिती होती. महोत्सवात सत्काराच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष केला.
कळंगुट येथे शिवप्रेमींनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कळंगुट पंचायतीने हटवण्यासाठी २ दिवसांपूर्वी नोटीस काढली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी २० जून या दिवशी आंदोलन करून पंचायतीला आदेश मागे घेण्यास आणि सरपंच यांना शिवप्रेमींची क्षमा मागण्यास भाग पाडले होते.
आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)