अ‍ॅक्सिस बँकेची किवीसह भागिदारी, रूपे क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून ‘क्रेडिट ऑन युपीआय’ला चालना देणार किवी अ‍ॅपच्या युजर्सना रूपे लाइफटाइम फ्री अ‍ॅक्सिस क्विक व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड सहजपणे वापरता येणार

.

अ‍ॅक्सिस बँकेची किवीसह भागिदारी, रूपे क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून ‘क्रेडिट ऑन युपीआय’ला चालना देणार
किवी अ‍ॅपच्या युजर्सना रूपे लाइफटाइम फ्री अ‍ॅक्सिस क्विक व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड सहजपणे वापरता येणार

राष्ट्रीय, २ ऑगस्ट २०२३ – अ‍ॅक्सिस बँक या भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एका बँकेने किवी या क्रेडिट ऑन युपीआय नावाच्या क्रांतीकारी प्लॅटफॉर्मशी भागिदारी केली आहे. या भागिदारीअंतर्गत रूपे क्रेडिट कार्डावर ‘क्रेडिट ऑन युपीआय’ सेवा उपलब्ध होणार आहे.
या भागिदारीमुळे किवी युजर्सना रूपे लाइफटाइम फ्री व्हर्च्युअल अ‍ॅक्सिस बँक क्विक क्रेडिट कार्ड अ‍ॅपच्या माध्यमातून सहजपणे वापरता येणार आहे. याच्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यामुळे युजर्सना युपीआयच्या माध्यमातून क्रेडिट वापरून किवी अ‍ॅपमधेच मर्चंट पेमेंट्स करता येतील. यामुळे प्रत्यक्ष कार्ड वापरण्याची गरज राहाणार नाही व सहजपणे व्हर्च्युअल पेमेंट करता येतील. या पूर्णपणे डिजिटल सुविधेमुळे ग्राहकांचे कोणत्याही सेवेसाठी पैसे भरण्याचे काम सोपे होईल. या भागिदारीमुळे त्यांना क्रेडिट कार्डाच्या रिवॉर्ड्सचा आनंद घेता येईल, तसेच युपीआयच्या वेगवान व सुरक्षित पेमेंट सुविधेचा सोयीस्करपणा अनुभवता येईल.

उत्पादनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये*
युपीआय अनेबल्ड मोफत व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड
खर्च केलेल्या प्रत्येक २०० रुपयांवर २ एज रिवॉर्ड्स
स्कॅन आणि पे व्यवहारांसाठी (युपीआयवर सीसी वापरून) १ टक्का कॅशबॅक, पॉवर्ड बाय किवी
१ टक्का इंधन अधिभारात सवलत

अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड्स आणि पेमेंट विभागाचे अध्यक्ष आणि प्रमुख संजीव मोघे म्हणाले, ‘अ‍ॅक्सिस बँक कार्ड्स व पेमेंट क्षेत्रातील आघाडीची बँक असून आम्ही सातत्याने नाविन्यपूर्ण भागिदारी करत असतो. भारतात क्रेडिट कार्ड सहज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही झटत आहोत. अ‍ॅक्सिस क्विक व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड लाँच करण्यासाठी किवीसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे ग्राहकांना युपीआयची वेगवान आणि सुरक्षित पेमेंट्स सुविधा क्रेडिट कार्डाच्या वैशिष्ट्यांसह अनुभवता येतील.’
‘गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंट क्षेत्र लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. आरबीआयने क्रेडिट कार्ड- युपीआय लिंकेजबाबत केलेल्या घोषणेमुळे युपीआय प्लॅटफॉर्मवरील कमी मूल्याच्या पेमेंट्ससाठी क्रेडिट कार्डाचा वापर वाढेल. यामुळे ग्राहकही क्रेडिट कार्ड घेण्यासाठी प्रोत्साहित होतील, कारण यापूर्वी युपीआयचा सोयीस्करपणा केवळ बँक खात्यापुरताच मर्यादित होता. अ‍ॅक्सिस बँक युपीआय पेमेंट्सचे विविध फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर आहे. भारतात औपचारिक क्रेडिट कार्ड सहज उपलब्ध करून देत त्याचे लोकशाहीकरण करण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू,’ असेही संजीव म्हणाले.
किवीचे सह- संस्थापक सिद्धार्थ मेहता म्हणाले, ‘भारताच्या खासगी क्षेत्रातील तिसऱ्या सर्वात मोठ्या – अ‍ॅक्सिस बँकेसह आमची पहिली बँकिंग भागिदारी करताना आनंद होत आहे. एनपीसीआयच्या सहकार्याने ही भागिदारी करण्यात आली आहे. किवीसाठी हा महत्त्वाचा टप्पा असून आम्ही ‘क्रेडिट ऑन युपीआय’ यंत्रणेत क्रांती घडवून आणण्याचा प्रवास सुरू करत आहोत. ‘क्रेडिट कार्ड्स विथ युपीआय’वर किवीचा भर असून तेच आमचे वेगळेपण आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या मदतीने आम्ही सहजपणे ग्राहकांचा या सेवेसाठी समावेश घेत त्यांना दमदार तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्काळ व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड्स मिळवून देऊ. यामुळे ग्राहकांना ‘क्रेडिट ऑन युपीआय’वर सर्वसमावेशक व संपूर्ण अनुभव मिळेल. पुढील १८ महिन्यांत युपीआयवर १ दशलक्ष युजर्सना क्रेडिट कार्ड्सची सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी बँकिंग भागिदारी करून हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.’
एनपीसीआयच्या प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी प्रवीणा राय म्हणाल्या, ‘अ‍ॅक्सिस बँक आणि किवी यांच्यातील भागिदारीविषयी आम्ही उत्सुक आहोत. हे दोन्ही घटक मिळून रूपे नेटवर्कवर ‘क्रेडिट ऑन युपीआय’ अनुभव ग्राहकांना उपलब्ध करून देतील. या सहकार्यामुळे मोठ्या ग्राहकवर्गाला क्रेडिट व पेमेंट सुविधा उपलब्ध होतील. या ग्राहकवर्गाला सहजपणे ऑनलाइन व ऑफलाइन व्यवहार करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित पेमेंटचे पर्याय वापरता येतील. रूपे क्रेडिट कार्डाचे रिवॉर्ड आणि लाभांचा युपीआयच्या सोयीस्करपणाशी सांगड घालणाऱ्या या सुविधेचा वापर वाढवण्यासाठी, त्याद्वारे विकास साधण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
फिनटेक कंपनी या नात्याने आम्ही ‘क्रेडिट कार्ड्स विथ युपीआय’वर लक्ष केंद्रित केले असून किवी हा सर्वसमावेशक पेमेंट प्लॅटफॉर्म ग्राहकांना आपल्या अ‍ॅपवर कर्ज उत्पादने त्याच्या पूर्ण चक्रासह उपलब्ध करून देतो. त्यामध्ये प्लॅटफॉर्मवर समाविष्ट होण्यापासून (व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड वितरणासाठी) ते वितरित केलेल्या ‘सीसी ऑन युपीआय’च्या माध्यमातून पेमेंट्स करण्यापर्यंत तसेच परतफेडीवर मिळणाऱ्या रिवॉर्डपर्यंतचा (किवी टोकन्स) समावेश आहे. किवी अ‍ॅपद्वारे ब्लॉकिंग, मर्यादा लागू करणे अशा कार्ड व्यवस्थापन सुविधाही उपलब्ध केल्या जातात. यामुळे युजर्सना त्यांची सद्य डेबिट कार्ड्स अ‍ॅपशी जोडता येईल.

किवीची स्थापना ज्येष्ठ फिनटेक तज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. त्यात सिद्धार्थ मेहता (माजी सीईओ, फ्रीचार्ज), मोहित बेदी (माजी अ‍ॅक्सिस बँक आणि पेयू) व अनुप अगरवाल (माजी व्यवसाय प्रमुख, लेझीपे) यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात कंपनीने प्री- सीड फंडिंगमध्ये नेक्सस व्हेंचर पार्टनर, स्टेलारिस व्हेंचर पार्टनर व इतर एंजल गुंतवणुकदारांकडून ६ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे.

(*)T&Cs apply
About Axis Bank:
Axis Bank is one of the largest private sector banks in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture, and Retail Businesses. With its 4,945 domestic branches (including extension counters) and 15,798 ATMs across the country as on 30th June 2023, the network of Axis Bank spreads across 2,754 cities and towns, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge, Axis Pension Fund and Axis Bank Foundation.
For further information on Axis Bank, please refer to the website: https://www.axisbank.com
About Kiwi:
Kiwi, a recently launched fintech startup, is revolutionizing the credit card landscape in India by harnessing the power of “Credit on UPI”, a recently introduced feature by NPCI. As a certified entity, Kiwi is the first app in India to offer customers the opportunity to experience “Credit on UPI” through its partnership with banks to issue RuPay Cards. The company aims to disrupt the credit card industry by becoming the leading issuer of RuPay Credit Cards by 2026.
Kiwi’s unique selling proposition is its complete end-to-end lifecycle management of the credit product inside the app. Kiwi plans to on-board 1 million customers in the first 18 months. Kiwi has raised $6 million in a pre-seed round from Nexus Venture Partners, Stellaris Venture Partners, and a host of angel investors. The company is headquartered in Mumbai, with offices across Delhi and Bengaluru.
Website | LinkedIn | Facebook | Twitter | Instagram

For media queries, please contact:

Axis Bank
Kiwi

Mittal Solanki | +91 9004909465 |
mittal.solanki@axisbank.com

Amrita Ganguly | +91 9930023793 |
amrita.ganguly@axisbank.com

Janki Telivala | +91 9892623468 | janki.telivala@adfactorspr.com

Pratik Balijepalli | +91-9167743244 | prateek.balijepalli@gokiwi.in
Dhanesh Kandhari | 91-9920373103 | dhanesh.kandhari@adfactorspr.com
Renuka Neelagandan| 91-9448091670| renuka.n@adfactorspr.com

*****

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें