श्री कमलेश्वर हायस्कूल देउळवाडा पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितिची निवड
श्री कमलेश्वर हायस्कूल देऊळवाडा येथे पालक शिक्षक संघाची सर्व साधारण सभा हल्लीच पार पडली. या सभेत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव नीळकंठ थळी, खास निमंत्रित हरमल मतदार संघाचे झेडपी सदस्य श्री रंगनाथ कलशावकर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री कृष्णा गावडे, संस्थेचे चेअरमन श्री परशुराम गावडे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री जालंधर गावडे, समुपदेशक हिना हळदणकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री भालचंद्र हिरोजी, तसेच पालक शिक्षक संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे औचित्य साधून झेडपी सदस्य श्री रंगनाथ कलशावकर यांच्याद्वारे झेडपी फंडातून अनुदानित सीसीटीव्ही कॅमेरा याचेही उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे पाऊल उचलल्याबद्दल संस्था व शाळेच्यावतीने त्यांचे स्मृतिचिन्ह प्रधान करुन आभार मानण्यात आले. तदनंतर पालक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या संघाच्या अध्यक्षपदी जालंधर गावडे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी उपाध्यक्ष न्हानू (समीर) वायंगणकर सचिव श्री मनोज भाटलेकर, सहसचिव सौ पूनम नाईक, खजिनदार श्री प्रदीप केरकर, उप खजिनदार श्री दिलीप नाईक, व अन्य सदस्यपदी श्री विवेक शिरोडकर, सौ लक्ष्मी वेंजी, श्री उपेंद्र नाईक, सौ सोनाली गावडे, श्री दीपक नर्से, सौ. उर्मिला हिरोजी व श्री संदीप कोरगावकर यांची निवड करण्यात आली. सचिव श्री मनोज भाटलेकर यांनी जमाखर्च व वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नवमी नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ ओवी नाईक यांनी केले.
कमलेश्वर हायस्कूल देउळवाडा पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितिची निवड
.
[ays_slider id=1]