म्हापसा वाताहार ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे आयोजित दांडा शिवोली येथील जीवन मुक्त महाराज मठात डॉक्टर सुशांत तांडेल यांच्या “अविस्मरणीय देशाटन “या पुस्तकाचे प्रकाशन मठाधीश परमपूजनीय मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अवित बगळे, ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत बेतकेकर,तीर्थाटन विभागाच्या प्रमुख राखी पालेकर ,विनय चोपडेकर ,विनय मडगावकर आदी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना परमपूजनीय मुकुंदराज महाराज यांनी तीर्थाटन केल्याने आपणास त्या प्रदेशातील भाषा, जेवण राहणीमान याविषयी जवळून पाहणे ची संधी मिळतेच तसेच अनुभवी मिळतो असे सांगताना त्यांनी आपणास प्रवास करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले .लेखक डॉक्टर सुशांत तांडेल यांनी आपणास ज्येष्ठ नागरिकांबरोबर जाण्याचा योग आला त्यामुळे देवदर्शनाबरोबर देवदर्शन तर झालेच पण त्याचबरोबर यात्रेमध्ये अनेक अकल्पित ,अविस्मरणीय, अनुभव अनुभवांची अनुभूती ही अनुभवायला मिळाली असे याप्रसंगी .बोलताना सांगितले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अवित बगळी यांनी या पुस्तकात डॉक्टर तांडेल यांचे लेखन प्रामुख्याने देशभरातील श्रद्धास्थाने व तीर्थस्थानाची निगडित असल्याचे सांगितले त्याना प्रवासादरम्यान आलेले अनुभव त्यांनी सोप्या व साध्या भाषेत मांडले आहे त त्यांच्या लेखनात नजरेसमोर शब्दचित्रे उभे करण्याची ताकद आहे असे पुढे बोलताना सांगितले. या प्रसंगी विनय मडगावकर ,सुजय गोकर्ण कर ,लक्ष्मीकांत परब गजानन भाटकर ,उषा परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया भाटकर यांनी केले तर स्वागत राखी पालेकर यांनी केले प्रास्ताविक ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी केले तर विनय चोपडेकर यांनी आभार मानले
फोटो
डॉ सुशांत तांडेल यांच्या अविस्मरणीय देशाटन या पुस्तकाचे प्रकाशन करताना प. पू मुकुंदराज महाराज बाजूला अवित बगळे, डॉ सुशांत तांडेल, भारत बेतकेकर राखी पालेकर, विनय चोपडेकर विनय मडगावकर
ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे आयोजित दांडा शिवोली येथील जीवन मुक्त महाराज मठात डॉक्टर सुशांत तांडेल यांच्या “अविस्मरणीय देशाटन “या पुस्तकाचे प्रकाशन

.
[ays_slider id=1]