*
पणजी : काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी सोडियमची पातळी तपासावी, या पर्यटनमंत्र्यांच्या विधानाला विरोध करत ते बनावट प्रमाणपत्र मिळवून डॉक्टर झाले आहेत की नाही हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तपासावे, असे काँग्रेसने सोमवारी म्हटले आहे.
काँग्रेस नेते महेश म्हांबरे यांनी सोमवारी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “सावंत यांनी अलीकडेच म्हटले होते की, किनारी भागात बनावट डॉक्टर प्रॅक्टिस करतात, आता खवंटे हे आमच्या नेत्याला सोडियम तपासण्याचा सल्ला देत असल्याने ते खोटे प्रमाणपत्र घेऊन डॉक्टर झाले आहेत का, हे त्यांनी तपासावे.”
यावेळी सरचिटणीस विजय भिके, वीरेंद्र शिरोडकर आदी उपस्थित होते.
पर्वरीच्या एका प्रकरणाशी संबंधित न्यायालयाने आपल्या आदेशात लोकांमध्ये भीती कशी निर्माण केली जात आहे याचे निरीक्षण नोंदवले आहे, याकडे म्हांबरे यांनी लक्ष वेधले.
” यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी, खवंटे हे मुद्दे वळवत आहेत,” असे म्हांबरे म्हणाले.
पर्वरीचे आणखी मुद्दे लवकरच उघड होणार असल्याने खवंटे यांनी तोल गमावू नये असे ते म्हणाले.
“वकील डॉ. ओलाव अल्बुकेर्क यांना पर्वरी येथे बेकायदेशीर घरांची पाहणी करायला गेला असता जमावाने मारहाण केली होती याचा संदर्भ देत वरिष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी खुल्या न्यायालयात सांगितले आहे की त्यांच्यावर देखील असा हल्ला होऊ शकतो आणि वकील आणि न्यायाधीश देखील सुरक्षित नाहीत.” असे ते म्हणाले.
अल्बुकेर्क विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर नंतर उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आणि जेव्हा एखाद्या वकिलाने त्याच्या क्लायंटसाठी साइटची पाहणी केली तेव्हा त्याच्यावर कसा हल्ला केला जाऊ शकतो हे निरीक्षण नोंदवले होते. असे हल्ले झाले तर बेकायदेशीर बांधकामाविरोधात तक्रार करण्यास कोणीही पुढे येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
” पर्वरीच्या आमदाराने त्यांच्या मतदारसंघात घडणाऱ्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल बोलायला हवे. येथील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल ते गप्प का आहेत?” असा प्रश्न त्यांनी केला.
व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपवर ते गप्प का आहेत, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की उच्च पोलीस अधिकाऱ्याने आमदाराच्या सांगण्याकरुन सरपंच रोशनी सावईकर आणि त्यांचे पती राजेश सावईकर यांना धमकी दिली आहे. एकतर त्यांनी ते स्वीकारावे किंवा त्या दोघांना धमकावताना त्यांचे नाव घेतल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करावी,” असे म्हांबरे म्हणाले.
आमदार रोहन खवंटे यांनी अल्बुकेर्क विरुद्धचा खोटा एफआयआर रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला प्रतिसाद का दिला नाही? त्याने त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर मोर्चा का काढला होता, असा सवाल त्यांनी केला.
सरचिटणीस विजय भिके म्हणाले की, रोहन खवंटे यांना पणजी सोडून पर्वरी मतदारसंघात का स्थलांतर करावे लागले याचे आधी आत्मपरीक्षण करावे. “त्याचा पणजीतील लोकांशी चांगला संबंध असेल तर त्यांनी तिथूनच निवडणूक लढवायला हवी होती. पर्वरीमधून त्यांनी निवडणूक का लढवली?” असा सवाल त्यांनी केला.
“गिरीशचे प्रश्न टाळून, पर्वरीमध्ये सुरू असलेल्या जंगलराजापासून ते सुटू शकत नाहीत. चोडणकर यांनी श्रीपाद नाईक यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांना किती मते मिळाली हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांचे राजकीय ज्ञान वाढवायला पाहिजे… त्यांना 1,64,597 मते मिळाली होती. 1995 मध्ये मडगांव कोंब वॉर्डातून गिरीश 80% मते घेऊन विजयी झाले. पणजीत मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात लढताना त्यांनी मते मिळ्वली. खवंटे यांनी पर्रीकरांच्या विरोधात लढण्याचे धाडस दाखवायला पाहिजे होते, असे भिके म्हणाले.
” पणजी नगरपालिका निवडणुकीत आल्तिन्हो वॉर्डातून प्रीतम राणे यांच्याकडून रोहन खवंटे यांचा पराभव झाला होता हे लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी गिरीश चोडणकर यांना अशा प्रश्नावर आव्हान देऊ नय.” असे भिके म्हणाले.
“पर्वरीमध्ये महिलांवरील अत्याचार, खून आणि इतर गुन्हे घडत आहेत. आमदारांना आपल्या लोकांची काळजी असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजले पाहिजेत.” भिके म्हणाले.
वीरेंद्र शिरोडकर म्हणाले की, पंच सदस्यांना लोक निवडून देतात, त्यामुळे त्यांनीच पंचायतीचा निर्णय घ्यावा. खवंटे यांनी त्यांच्या इच्छेनुसार कामे करण्यासाठी त्यांना दडपून टाकू नये किंवा ब्लॅकमेल करू नये.
“दुसरं म्हणजे त्यांनी बहुजन समाजाला दडपून टाकू नये, त्यांना विचार करून निर्णय घेता येतो ,” असं ते म्हणाले.