सार्वजनिक मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सलोख्याचे कार्य केले—निवृत्त उपसंचालक उमाकांत कोरकणकर.हरमल गणेशोत्सव स्मरणिकेचे विमोचन.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून,धार्मिक सलोखा निर्माण केला आहे.हरमल च्या मंडळाने उत्कृष्ट कार्य करताना,समाजाला एकोप्याने कार्यरत ठेवण्याचे कार्य सदोदित चालू ठेवावे असे प्रतिपादन निवृत्त पंचायत उपसंचालक उमाकांत कोरकणकर यांनी केले.
हरमल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 30 व्या उत्सवानिमित्त स्मरणिका उदघाटन सोहळ्यात बोलत होते.सामाजिक क्षेत्रांत कार्य करून मंडळाने अनेकविध आव्हाने लिलया पार केली.मंडळाच्या सदस्यांचे योग्य मार्गदर्शन व उपयुक्त कार्याद्वारे मंडळाने भव्य वास्तू उभारली व त्यातून अलौकिक कार्यक्रम दरवर्षी सादर करण्याची परंपरा कायम राखल्याने उमाकांत कोरकणकर यांनी उत्सव समितीचे अभिनंदन केले.यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे ऍड कृणाल ठाकूर,पत्रकार चंद्रहास दाभोलकर, माजी अध्यक्ष विनायक वस्त व मंडळाचे अध्यक्ष आपा वायगंणकर उपस्थित होते.गेल्या 30 वर्षात मंडळाने समाजाभिमुख कार्य करताना, लोकांत विश्वास निर्माण केला.सांस्कृतिक कार्यक्रमाची एक परंपरा निर्माण केली व यंदा स्मरणिकेद्वारे एक आदर्श निर्माण करण्यात अध्यक्ष आपा वायगंणकर व समिती यशस्वी झाली असल्याचे दिसून येते,त्याबद्दल कौतुक असल्याचे मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रहास दाभोलकर यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव मंडळाने 30 वर्षात अनेक कार्यक्रम केले.मात्र सामाजिक क्षेत्रांत अडल्यानडलेल्या लोकांसाठी मदतरुपी कार्य चालू करावे असे आवाहन ऍड कृणाल ठाकूर यांनी व्यक्त केले.प्रारंभी मंडळाचे सचिव महेश गावडे यांनी स्वागत केले.उपाध्यक्ष प्रकाश केपकर,दामोदर रामजी,कार्यक्रम समिती अध्यक्ष भरत वस्त,क्रीडा समिती अध्यक्ष सुशांत रामजी,तुकाराम माज्जी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी मान्यवरांनी स्मरणिकेचे विमोचन केले.
सूत्रनिवेदन सचिव महेश गावडे तर कार्यक्रम समिती अध्यक्ष भरत वस्त यांनी आभार मानले.यंदाची श्री गणेशमूर्ती (मूर्तिकारअरुण गवंडी) व देखावा(अनुष पोके) साई महिमा पर्यावरण पूरक असून अश्विन अनिल वायगंणकर यांनी श्रीचरणी अर्पण केला आहे.
फोटो
हरमल–सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 30 व्या उत्सवानिमित स्मरणिका विमोचन सोहळ्यात निवृत्त पंचायत उपसंचालक उमाकांत कोरकणकर, चंद्रहास दाभोलकर, कृणाल ठाकूर,महेश गावडे,मंडळाचे अध्यक्ष आपा वायगंणकर व विनायक वस्त.