बाळ गोपाळ मंडळ संस्था, अन्साभाट म्हापसा, व्दारे सुवर्ण महोत्सवी “श्रीकृष्णोत्सव” निमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

.

बाळ गोपाळ मंडळ संस्था, अन्साभाट म्हापसा, व्दारे सुवर्ण महोत्सवी “श्रीकृष्णोत्सव” निमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बाळ गोपाळ मंडळ यंदा आपले पन्नासावे श्रीकृष्ण पूजन साजरे करीत आहे, त्यानिमित्त एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून म्हापसा नगरपालिकेचे माज नगराध्यक्ष श्री आशिष शिरोडकर उपस्तीत होतें. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बाळ गोपळ मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री सुशांत परब यांनी प्रमुख पाहुण्यांचे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. श्री आशिष शिरोडकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्री आशिष शिरोडकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व अन्साभाट येथे मी दहा वर्षे नगरसेवक मानून काम केले असल्याने, येथे प्रत्येक जण आपल्या चांगल्या परिचयाचा असल्याने, येथील प्रत्येक कार्यक्रमास आपले सदैव सहकार्य लाभेल असे श्री आशिष शिरोडकर यांनी सागितले. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री संजय राऊत यांच्या हस्ते श्री शिरोडकर यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिद्धेश राऊत यांनी केले व श सचिव श्री परेश गावस यांनी शेवटी सगळ्या मान्यवरांचे तसेच उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें