*गुगल ने केला हिंदी सिनेमाच्या ऑनलाईन प्रदर्शनाचा शुभारंभ*
● १०० वर्षांहून जुन्या चित्रपट सृष्टी चा आढावा घेत गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर तर्फे १२० हून अधिक कथानकांसह ७ हजारांहून अधिक मिडिया ॲसेट्सचे प्रदर्शन
● जगभरात प्रथमच असलेल्या या प्रदर्शनाची सुरुवात ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया २०२३ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले
● भारत आणि जगभरांतील २१ भागीदार संस्थांचे सहकार्य
*गोवा, २२ नोव्हेंबर २०२३:* शतकापेक्षा अधिक कालावधीचा इतिहास असलेल्या व जगभरांतील प्रतिथयश अशा हिंदी चित्रपट सृष्टीला डिजिटाईज करण्याच्या उक्रमाचा एक भाग म्हणून गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर तर्फे आज सर्वांत मोठ्या अशा हिंदी सिनेमावरील ऑनलाईन प्रदर्शनाची सुरुवात केली. चित्रपट रसिक आणि सामान्य जनतेला मोफत असे हे प्रदर्शन असून गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर च्या मंचावरुन तंत्रज्ञानाचा वापर करत हे प्रदर्शन उपलब्ध होणार आहे. मध्ये गुगलच्या ऑग्मेंटेड रिॲलिट आणि स्ट्रीट व्ह्यू मुळे आपल्याला अनोखा असा अनुभव प्राप्त होऊन या माध्यमातून १२० तज्ञांनी तयार केलेल्या कथा आणि ५००० हाय रेझ फोटोज, १५०० हून अधिक व्हिडिओज, पोस्टर्स आणि चित्रपटांशी निगडीत गाण्यांसह ७ हजारांहून अधिक मालमत्ता आपल्याला पहाला मिळणार आहेत. यामध्ये अगदी सुरुवातीच्या “मंथन” पासून ते आधुनिक ब्लॉकबस्टर्सचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे आयोजन हे २१ विविध सांस्कृतिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात येत असून या मध्ये नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया, दि म्युझियम ऑफ आर्ट ॲन्ड फोटोग्राफी आणि यशराज फिल्म्स यांचा समावेश आहे.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया २०२३ च्या फिल्म बझार चे उद्घाटन करतांना माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रिडा विभागाचे केंद्रीय मंत्री माननीय श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितले “ चित्रपट हे आपल्याला समाज म्हणून एकत्र येऊन एकमेकांच्या कलांना साजरे करण्यास प्रोत्साहीत करत असतात. भारत आणि जगभरांतील प्रेक्षकांना ऑनलाईन घराच्या माध्यमातून आकर्षक अनुभवाने युक्त सिनेमॅटिक अनुभव देतांना मला आनंद होत आहे. मी प्रत्येकाला विनंती करेन की या हिंदी सिनेमा प्रदर्शनासह फिल्म बझार सह गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर प्लॅटफॉर्म ला भेट द्यावी आणि इतिहासाची जादू ही गेल्या शतकभरापासून आकार घेत आहे आणि समाजातील एक महत्त्वाचा घटक तसेच आपली जागतिक सॉफ्ट पावरही आहे.”
फिल्म बझारच्या उद्घाटना दरम्यान आपले विचार व्यक्त करतांना गुगल इंडिया चे कंट्री हेड आणि व्हाईस प्रेसिडेंट संजय गुप्ता यांनी सांगितले “ लोक, समाज आणि संस्कृत यांना एकत्र आणण्यामध्ये कथाकथनाचे मोठे योगदान आहे आणि भारतीय इतिहासासह कालातीत अशी जोडणी चित्रपटांनी दिली आहे. फिल्म्स मुळे नवीन स्तरावरील आणि कथाकथनाची जादू घडते- अगदी शैक्षणिक समस्या, भारतातील भाषे विषयीच्या समस्या अगदी सहज एकत्र आणून विविध स्तरावर छाप सोडली जाते. प्रत्येकाचे म्हणणे जगासमोर मांडण्याचे व्रत आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सुरु ठेवले असून आम्ही आता यूट्यूबच्या या दोन जबाबदार्या पार पाडत आहोत त्या म्हणजे कथाकथनाचे लोकशाहीकरण करणे आणि भारतीय चित्रपट सृष्टी चे कार्य समोर आणून कलाकार आणि क्रिएटर्सना भारत आणि जगभरांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, याकरता ब्लिडींग एज एआय आणि मशीन लर्निंगचा वापर करुन कलाकार आणि प्रेक्षकांची सुरक्षा लक्षात घेण्यास योग्य इकोसिस्टम निर्माण करत आहोत.”
या सादरीकरणा विषयी बोलतांना गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर चे संचालक अमित सूद यांनी सांगितले “ भारत आणि जगभरांतील २१ हून अधिक भागीदार संस्थांच्या सहकार्याने गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर ने अनोखी अशी आदरांजली भारतातील मुव्ही मेकिंग संस्कृतीला वाहिली आहे. ही मानवंदना चित्रपट तज्ञ, क्युरेटर्स आणि सांस्कृतिक संस्थांच्या पॅशनला वाहण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या वंदनीय अशा हिंदी सिनेमातील योगदानाला प्रत्येकाला उपलब्ध करुन त्यांनी एकत्र आल्या बद्दल त्यांचे आभार मानतो आणि आशा करतो की भविष्यात यामध्ये वाढ होऊ लागेल.”
या सादरीकरणाची निर्मिती ही प्रेक्षकांना आणि चित्रपटाच्या चाहत्यांना हिंदी सिनेमाच्या जगात विहार करण्याची संधीप्राप्त करून देण्यासाठी करण्यात आली असून यामध्ये आयकॉनिक चित्रपटांची कथानके, क्षेत्रातील दिग्गज आणि ३डी व्हर्च्युअल गॅलरी सह व्हर्च्युअल हॉल ऑफ फेम आपल्याला पहायला मिळणार असून यांत पोर्स्टर्स फिल्म आर्काईव्ह्ज आणि संगीताचा समावेश आहे. स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून पाहुण्यांना मुंबईतील आयकॉनिक आर्ट डेको थिएटर्स जसे लिबर्टी आणि रिगल सिनेमा ची टूर ३६० अंशातील व्हर्च्युअल माध्यमातून तर ऑग्मेंटेड रिॲलिटी च्या माध्यमातून त्यांना आयकॉनिक चित्रपटांच्या हाताने रंगवलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्स ची वॉल स्मार्टफोन्स वर ठेवता येणार आहे.
यावेळी बोलतांना इफ्फी आणि फिल्म बझार चे फेस्टिव्हल डायरेक्टर प्रिथुल कुमार यांनी सांगितले “ सिनेमा ही एक वैश्विक भाषा आहे जी सीमांना पार करुन लोकांना एकत्र आणते, आणि हा फेस्टिव्हल कॅमेर्याच्या लेन्स मधून कथाकथनाची शक्ती अधोरेखित करत आहे. गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत असून यामुळे अजोड अशा श्रीमंत सिनेमॅटिक प्रवासासह मौल्यवान आर्काईव्हल कंटेंट उपलब्ध केल्याबद्दल आम्ही खूपच उत्साही आहोत.”
या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनुपमा चोप्रा यांनी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज असलेल्या शबाना आझमी आणि करण जोहर अशा कलाकारांच्या घेतलेल्या मुलाखती होत. या मध्ये फिल्म कम्पॅनियन कडून विशेषरुपाने तयार केलेल्या व्हिडिओ सिरीजचा समावेश आहे.
आठवडाभर चालणार्या संभाषणात्मक इफ्फी २०२३ मधील फिल्म बझारचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ऑनलाईन प्रदर्शनात महोत्सवाला भेट देणार्या लोकांना हिंदी फिल्म्सची जादू आणि आवड वैयक्तिक रित्या अनुभवता येणार आहे.
गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चर ने विशेष तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरांतील सांस्कृतिक भागीदारांना सांस्कृतिक खजिना आपल्या बोटांवर आणून दिला आहे. गेल्या दशकभरापासून गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चरने भारतातील १०० हून अधिक संस्थां बरोबर काम केले असून याची सुरुवात ही नॅशनल म्युझियम, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांसारख्या संस्था पासून केली असून यातून भारतातील समृध्द कलेची परंपरा अधोरेखित करण्यात आली आहे. आपले जागतिक अपील म्हणून पर्यटन स्थळ, २५० हून अधिक सांस्कृतिक स्मारके आणि स्थापत्य शास्त्रातील घटक जसे जागतिक हेरिटेज साईट्स ताज, महाबलीपुरम आणि हम्पी सह भारतीय रेल्वेची १५० वर्षे यांसह डिजिटायझेशन ऑफ नॅशनल ट्रेझर्स जसे नॅशनल म्युझियम कलेक्शनचा समावेश करण्यात आला आहे. जगभरांतील या सर्व गोष्टी तुम्हाला आता गुगल आर्ट्स ॲन्ड कल्चरच्या वेबसाईट सह मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत.