*गोवा पर्यटन विभाग छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक जयंती सोहळा मोठ्या दिमाखात करणार साजरा*
*विविध सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा*
*पणजी, 13 फेब्रुवारी 2024* – गोवा पर्यटन विभाग 18 आणि 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा भव्य राज्याभिषेक जयंती सोहळा साजरा करणार आहे. हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरणीय असे ऐतिहासिक व्यक्तिमत्व, त्यांचे ऐतिहासिक शौर्य आणि त्यांचा समृद्ध वारसा यांचे दर्शन घडवेल.
गोव्याचे माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन अ. खंवटे यांनी बिचोलीमचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मायेम मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रमुख उपस्थितीत 18 आणि 19 फेब्रुवारी 2024 रोजी बिचोलीम येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली.
18 फेब्रुवारी 2024 रोजी, या सोहळ्याची सुरुवात अखिल गोवा वेषभूषा स्पर्धेने होईल. उद्घाटन कार्यक्रमात पारंपारिक ‘दीप प्रज्वलन’ सोहळा आणि स्वागत गीत सादर केले जाईल. संध्याकाळचा समारोप ऑल गोवा महिला फुगडी स्पर्धेसह होईल, या पारंपारिक गोवा नृत्य प्रकारातून स्त्रीत्वाची भावना साजरी होईल.
19 फेब्रुवारी 2024 ला, बिचोलिम बोर्डेमपासून शोभायात्रा निघेल, ज्यामध्ये राज्याभिषेक सोहळा दर्शविणारी जिवंत पात्रे दाखवली जाणार आहेत. ही शोभायात्रा बिचोलीम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर निघेल, ज्यामध्ये दिंडी, लेझीम, ढोल ताशे, पताका आणि बरेच काही दाखवणाऱ्या गटांचे मनमोहक सादरीकरण करण्यात होईल.
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि पारितोषिक वितरणाची रेलचेल असेल. सांस्कृतिक कार्यक्रमाने गोव्याचा समृद्ध वारसा साजरा होईल. यावेळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे, पर्यटन मंत्री रोहन अ. खंवटे, बिचोलीमचे आमदार डॉ.चंद्रकांत शेट्ये, मायेचे आमदार प्रेमेंद्र शेटय़े बिचोलीम येथे 19 फेब्रुवारीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी मैदान बिचोलीम येथे मुंबईचा चमू ’मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
19 फेब्रुवारीला संध्याकाळी पर्वरी येथे आयएचएम कॉलेजजवळ संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानवडे यांच्यासह माननीय पर्यटन मंत्री रोहन अ. खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार साळीगाव केदार नाईक, जि.प. कविता नाईक, सरपंच स्वप्नील चोडणकर, सरपंच सोनिया पेडणेकर यांच्यासह मान्यवर पंच सदस्य पुतळा अनावरण समारंभास उपस्थित राहणार आहेत.
हा उत्सव संध्याकाळपर्यंत सुरू राहील, उद्घाटन समारंभानंतर नंदेश उमप आणि त्यांचे सहकारी ‘शिवसोहळा’ हा मंत्रमुग्ध करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. लेझिम आणि कोळी नृत्य यांसारखे पारंपारिक नृत्य देखील सादर केले जाईल. तसेच शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे रंगमंचावर सादरीकरण केले जाईल.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन डिआयईटी (DIET)हॉल, पर्वरी येथे होणार आहे. हे अनोखे प्रदर्शन 18 ते 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत खुले राहणार आहे. सर्व शाळांना एका अनोख्या शैक्षणिक अनुभवासाठी प्रदर्शनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
गोव्याचे माननीय पर्यटन मंत्री, श्री रोहन अ. खंवटे यांनी सांगितले की, “जशी 2024 मध्ये शिवाजी महाराजांची 350 वा राज्याभिषेक जयंती सोहळा जवळ येत आहे, तसतसे सांकली, मडगाव, वास्को आणि म्हापसा, पर्वरी येथे उत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी आमचा इतिहास जतन करण्यासाठी आणि पर्यटकांना आमच्या ओळख आणि वारशासोबत जोडण्यासाठी तरुण आणि स्थानिक समुदायांचा अधिक सहभाग वाढविणे याकरिता या प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांमध्ये शिवाजी महाराजांच्या वारशाचे प्रतीक असणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सादरीकरण यांचा समावेश असेल आणि तरुणांना आणि स्थानिक समुदायांना आपला इतिहास जतन करण्यासाठी प्रेरणा देईल.”
या भव्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गोवा पर्यटन विभाग सर्वांना हार्दिक निमंत्रण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा कालातीत वारसा साजरा करण्यासाठी एकत्र य़ा, असे आवाहन करतो.
***