म्हापसा सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव नऊ एप्रिल रोजी आयोजन व्याख्यान शोभायात्रेस होणार विविध कार्यक्रम

.

म्हापसा सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव नऊ एप्रिल रोजी आयोजन व्याख्यान शोभायात्रेस होणार विविध कार्यक्रम
म्हापसा – नववर्ष स्वागत समिती माफसातर्फे येत्या दिनांक ९ एप्रिल रोजी सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव मागचा येथील टॅक्सी स्टैंड वर साजरा केला जाईल यंदाचे हे २१ वे वर्ष आहे अशी माहिती उत्सव कार्यवाह प्रशांत बर्वे यांनी दिली.
म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष संजय वालावलकर, उत्सव समितीचे महेश कोरगावकर, सल्लागार प्रा.अनिल सामंत,नारायण शिंदे, सचिव प्रशांत बर्वे,खजिनदार भूषण गावडे, सदस्य रितेश नेवगी, माया शिरोडकर,विजय तिनईकर, सुधांशु साळवी, कौस्तुभ नाटेकर, आदित्य मिशाळ,समीर शिरोडकर, सागर खलप, संदीप आजगावकर, दर्शन शेट्ये, संतोष गावडे, योगेंद्र मांद्रेकर, पूजा दाभाळे हे सदस्य उपस्थित होते.
अध्यक्ष महेश कोरगावकर म्हणाले पहाटे ५ वाजता विविध प्रभागातील शोभायात्रा प्रारंभ होईल तर पहाटे ५.१५ वाजता श्री मारुती मंदिर मंदिराजवळ सर्व शोभायात्रांचे एकीकरण भव्य शोभायात्रेचा सुरुवातीला शहराला वळसा घेत म्हापसा टॅक्सी स्टँड वर शोभा यात्रेची सांगता होईल. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संजय वालावलकर म्हणाले की,येथील टॅक्सी स्टॅन्ड वर लहान मुलांचे वेशभूषा सादरीकरण व सकाळी ६ वाजता सार्वजनिक गुढी उभारणी होईल.यावेळी श्री मारुती स्तोत्र वर रामरक्षा पटना होईल त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांचे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर भाषण होईल.
फोटो :-यंदाच्या उत्सव समितीचे पदाधिकारी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें