हिंदु जनजागृती समितीची गोवा सरकारकडे मागणी ‘संस्कृतीद्रोही ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !’’

.

हिंदु जनजागृती समितीची गोवा सरकारकडे मागणी
‘संस्कृतीद्रोही ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !’’
       पणजी, ३० जुलै – ‘सनबर्न’च्या आयोजकांनी सरकारची अनुमती न घेताच यंदा दक्षिण गोव्यात ‘सनबर्न २०२४’चे आयोजन करणार असल्याचे घोषित केले आहे. विशेष म्हणजे तिकीट विक्रीलाही प्रारंभ केला आहे. युवा पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी नेणारे आणि व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ आणि ‘सनबर्न’सारख्या महोत्सवांना केवळ दक्षिण गोव्यात नव्हे, तर संपूर्ण गोव्यात कुठेही अनुमती देऊ नये. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘भारत माता की जय’ संघटनेचे श्री. रामदास सावईवेरेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांचा समावेश होता.
‘सनबर्न गोव्यात चालू झाला तेव्हापासूनच हिंदु जनजागृती समिती त्याच्या आयोजनाला विरोध करत आहे. गेल्या वर्षी उत्तर गोव्यातील पर्यावरण प्रेमी आणि संस्कृती प्रेमी लोकांनी या महोत्सवाला विरोध दर्शवला होता आणि त्यावेळी सनबर्नचे मालक सिंग यांनी आपला शेवटचा महोत्सव असेल असे घोषित केले होते. तरी यावर्षी सनबर्न दक्षिण गोव्यात आयोजित करणार असे सांगून तिकीट विक्री चालू केली आहे आणि गोमंतकियांना फसवले आहे. मोठ्या आवाजातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक गोव्यात समुद्रकिनार्‍यावरील अनेक पब आणि रेस्टॉरंट क्लब यामध्ये चालू असते यालाही स्थानिकांचा विरोध असतो. यामुळे परिसरातील नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होतो. उच्च न्यायालयाने याची दखल घेतली आहे. या कार्यक्रमावरही सरकारने बंदी घालायला हवी.

आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समितीकरिता,
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें