बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पणजी येथे १० ऑगस्टला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

.

बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पणजी येथे १० ऑगस्टला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
पणजी, ९ ऑगस्ट – बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. तेथ हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भारत सरकारने बांगलादेशी येथील हिंदूंचा नरसंहार थांबवावा आणि तेथील हिदूंना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी या मागणीला अनुसरून हिंदु राष्ट्र समन्वयक समितीच्या वतीने शनिवार, १० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन केले जाणार आहे. समस्त हिंदूंनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें