खोरजूवे येथील श्री ब्राह्मण देवस्थानत पहिल्या श्रावणी गुरुवार निमित्त मोहनदास पोळे आणि साथी कलाकार याचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पांडुरंग राऊळ, महाबळेश्वर च्यारी, उदय भोमकर यांनी त्यांना साथसंगत दिली.
तबला साथ निशिकांत कलंगुटकर, ढोलक साथ प्रसाद कलंगुटकर, तर हार्मोनियम निलेश गोवेकर यांनी दिली.
जेष्ठ भजनी कलाकार मोहनदास पोळे यांनी हा भजनाचा कार्यक्रम आपल्या राहत्या गावी खोरजूवे येथे श्री ब्राह्मण देवस्थान मंदिरात केला होता.
उदयमुख कलाकारांना सदैव प्रोत्साहन दिले असून कलाकार भजनी श्रेत्रात आपले नाव कमवावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो भारत बेतकेकर
खोरजूवे येथे श्री ब्राह्मण देवस्थान गायन करताना मोहनदास पोळे, महाबळेश्वर च्यारी व इतर