पीपल्स विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात
पणजी : पीपल्स विद्यालयाने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडविले , त्यांच्या जीवनास आकार दिला .
या विद्यालयाचा मी आजन्म ॠणी आहे. विद्यार्थीबांधवानी समर्पित भावनेने अध्ययन करून, परिश्रम घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन पीपल्सचे माजी विद्यार्थी तथा ‘एडकॉन रिअल इस्टेट डेव्हलपर्स’चे प्रोपायटर
एडविन मिनेझिस यांनी केले .मळा -पणजी येथील पीपल्स विद्यालय आयाेजित ७८ व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बाेलत होते. यावेळी पीपल्स एज्यूकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल देशपांडे , एसएफएएल विभाग प्रमुख क्लेअर गुदिन्हो, प्राथमिक विभाग प्रमुख ॲना परेरा, आनंदी सुर्लकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मरिलीया एस्टीव्हज, उच्च माध्यमिकच्या प्राचार्य सिद्धार्थी नेत्रावळकर, पालक -शिक्षक संघाचे अध्यक्ष सिद्धेश सिनाय घांटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर पीपल्सच्या विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. इयत्ता चौथीच्या आध्या कुलकर्णी या विद्यार्थीनीने स्वातंत्र्यदिनाबद्दल आपले मनोगत तर इयत्ता सहावीच्या केशव कुंडईकर या विद्यार्थ्यांने विजयसिंह आजगांवकर रचित ‘भारत देश महान ‘ ही देशभक्तीपर कविता सादर केली. उच्च माध्यमिक विभागाचा सांस्कृतिक प्रतिनिधी प्रियमेध सहस्त्रबुद्धे याने अवधारित केलेले १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित प्रहसन उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी सुंदरपणे पेश केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राहूल देशपांडे , परिचय त्रिवेणी सरदेसाई , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा तळेकर यांनी तर आभारप्रदर्शन उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थी सरचिटणीस सान्वी जोशी हिने केले.