VishwasKaDeep या नवीन ब्रॅंड अभियानासह OPPO India दिवाळी साजरी करणार

.

#VishwasKaDeep या नवीन ब्रॅंड अभियानासह OPPO India दिवाळी साजरी करणार

एका ब्रॅंड फिल्मच्या माध्यमातून दिवाळी दरम्यान सर्वत्र दिसणारी विश्वास आणि आशेची सामायिक भावना व्यक्त केली
AI-प्रेरित कस्टमाइझ्ड दिवाळी पोस्टकार्ड बनवता यावीत या हेतूने स्मार्टफोन यूझर्ससाठी एक मायक्रोसाइट लॉन्च केली
‘द्या 0, काळजी 0, जिंका 10 लाख रु.’ या भव्य उत्सवी सेलसह ग्राहकांना खुश केले

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024: या दिवाळीत OPPO India ने आपल्या #VishwasKaDeep या नवीन मोहिमेद्वारे उत्सवी वातावरण उजळून टाकले आहे. एका आकर्षक फिल्मच्या आणि काही डिजिटल अनुभवांच्या माध्यमातून हे अभियान देशभरात अनोख्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचा शोध घेते, ज्यातून ‘विविधतेत एकता’चा प्रत्यय येतो. ‘प्रत्येक दिवाळीत विश्वासाचा दीप प्रज्वलित होतो’ हा संदेश या सणासुदीच्या मोसमात लोकांना आणि समुदायांना जोडणाऱ्या सखोल विश्वासाचा आणि आशेचा गौरव करतो.
OPPO india च्या यूट्यूब, इन्स्टाग्राम, OTT प्लॅटफॉर्म्स आणि सिनेमात सध्या दिसत असलेली हृदयस्पर्शी अॅड फिल्म प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रांतांची सहल घडवते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात या फिल्मची सुरुवात होते. यात, एक तरुण वाळूच्या भयानक वादळात जोधपूरला आपल्या घरी पोहोचतो. त्याच्या आईने घराच्या छतावर लावलेल्या दिवाळीच्या दिव्याच्या रोखाने चालत तो घरी पोहोचतो. या फिल्ममध्ये ‘थारमधली दिवाळी’ दाखवली आहे व सोबत कठपुतळी हा कलाप्रकार देखील आहे.

हा प्रवास हिमाचल प्रदेशातील सुंदर डोंगराळ प्रदेशात पोहोचतो. येथे ‘बुढी दिवाळी’ची (अनेक समुदायात सुमारे एक महिन्यांनंतर साजरी केली जाते) जुनी परंपरा मध्यरात्रीच्या शेकोटी च्या उजेडात, नटी लोकनृत्य आणि संगीताच्या साथीने पडद्यावर जिवंत होते. शेवटी ही फिल्म गोवा या समुद्रकिनारपट्टीच्या शहरात पोहोचते. येथील जल्लोषपूर्ण नरकचतुर्दशीचे सेलिब्रेशन दाखवले जाते. यावेळी नरकासुराच्या पुतळ्यांची मिरवणूक काढण्यात येते आणि पहाटेच्या सुमारास फटाक्यांच्या वर्षावात हे पुतळे जाळून दिवाळीची सुरुवात करण्यात येते.
हा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी OPPO India ने एक इंटरॅक्टिव्ह मायक्रोसाइट microsite सुरू केली आहे. यावर यूझर्स दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश वगैरे राज्यांतील दिवाळीशी संबंधित अनोख्या परंपरा बघू शकतील आणि दिवाळीसाठी स्वतः AI-प्रेरित पोस्टकार्ड बनवू शकतील. (खालील टेंप्लेट्स बघा)
या मोहिमेत OPPO India ची Reno12 Pro 5G, F27 Pro+ 5G, आणि A3 Pro 5G ही उत्पादने अगदी टोकाच्या परिस्थितीतही सुंदर क्षण टिपून आपला टिकाउपणा आणि विश्वासार्हता सिद्ध करताना दाखवली आहेत.
OPPO India चे Head of Brand Marketing Karan Dua म्हणाले, “#VishwasKaDeep सह आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या दिवाळीच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा एकत्र आणत आहोत. ‘प्रत्येक दिवाळीत विश्वासाचा दीप प्रज्वलित होतो’ या संदेशातून दाखवले आहे की, दिवाळीदरम्यान विश्वास आणि आशेचा दिवा कसा कुटुंबांना, मित्रांना आणि समुदायांना एकत्र आणतो! या अभियानाचा एक भाग म्हणून आम्ही एक इंटरॅक्टिव्ह मायक्रोसाइट तयार केली आहे. ज्यामध्ये यूझर्स विविध प्रांतांमध्ये दिवाळी कशी साजरी होते हे पाहू शकतात आणि स्वतःच AI-प्रेरित दिवाळी पोस्टकार्ड बनवू शकतात. विश्वास आणि लवचिकतेची ही भावना OPPO India च्या टिकाऊ आणि विश्वसनीय स्मार्टफोन द्वारे आपल्या यूझर्सना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या वचनबद्धतेशी मिळतीजुळती आहे.”
या अभियानाचा शोध घ्या आणि बघा, या दिवाळीत विश्वासाचा दीप कसा आपल्या सगळ्यांना एकत्र आणतो. तो व्हिडिओ here बघा:
OPPO India चा उत्सवी सेल – ‘द्या 0, काळजी 0, जिंका 10 लाख रु.’

या पवित्र मोसमात OPPO India ने आपली ‘द्या 0, काळजी 0, जिंका 10 लाख रु.’ ऑफर आणली आहे. यामध्ये Reno 12 Pro 5G आणि F27 Pro+ 5G सारख्या OPPO स्मार्टफोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI, शून्य डाऊन पेमेंट, शून्य प्रोसेसिंग फी आणि तत्काळ कॅशबॅक वगैरे ऑफर आहेत. या ऑफर OPPO India रिटेल स्टोअर, OPPO ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत उपलब्ध आहेत.

7 नोव्हेंबर 2024 पूर्वी OPPO स्मार्टफोन खरेदी करणारे सर्व जण ‘My OPPO Exclusive Raffle’ साठी आपसूक पात्र ठरतील आणि 10 लाख रु., OPPO Find N3 Flip फोल्डेबल स्मार्टफोन्स, OPPO Enco Buds2 TWS, OPPO पॅड, एक स्क्रीन प्रोटेक्शन प्लान, OPPO Care+ चे सब्स्क्रिप्शन, रिवॉर्ड पॉइंट आणि इतर रोख बक्षिसे जिंकण्याची संधी त्यांना मिळेल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar