आश्वे मांद्रे मंदिरातील पाषाण हटवल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा नोंद

.

आश्वे मांद्रे मंदिरातील पाषाण हटवल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा नोंद

आश्वे मांद्रे येथील मंदिरातील सातूसमन पाषाण जागेवरून हलवणे आणि बाहेर फेकणे तसेच मंदिरातील वस्तू आणि सामग्रीची नासधूस प्रकरणी मांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 298, 324 (4), 35 (3) आणि 3 (5) अंतर्गत 5 जणांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

 

मंदिराचे जाणते आणि पुजारी राजेश बाबली सावंत, कालिदास दत्तारामसावंत, प्रकाश भगवान सावंत, चंद्रकांत लाडू सावंत, चंद्रकांत श्री. सावंत यांनी केलेल्या तक्रारीस अनुसरून पोलिसांनी संशयित आरोपी यशवंत बुदो सावंत, यश बुदो सावंत, बुदो आपा सावंत, सिध्देश सदानंद सावंत आणि सीताराम विमल आश्वेकर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. या सर्वांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या मंदिरातील गंर्भकुडीतील पवित्र जागेतील सातूसमनचे पाषाण जागेवरून हटवले आणि बाहेर फेकले, मंदिरातील सामानाला नुकसान पोहचवले, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. असा प्रकार दुसर्‍यांदा केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

एखाद्या मंदिरातील श्रध्दास्थानांना धोका पोहचवणे आणि मूर्ती विभंजनासारखे प्रकार याला भारतीय न्याय संहितेत कडक कारवाईची तरतूद आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार काही कलमे अजामीनपात्र आहेत. त्यानुसार 2 ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा तसेच 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा संशयितांना होवू शकते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar