हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर ‘सेरेंडिपिटी कला महोत्सवा’च्या प्रदर्शनात हिंदूंच्या मंदिरांची छायाचित्र आणि माहिती झाली प्रदर्शित
पणजी, २२ डिसेंबर – शहरात गेल्या आठवड्यापासून सेरेंडिपिटी कला महोत्सव चालू आहे. महोत्सवाच्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विविध विषयांवर प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. महोत्सवाच्या अंतर्गत अशाच प्रकारचे गोव्याच्या जीवनपद्धतीवर आधारित एक प्रदर्शन पणजी येथील वन खात्याच्या उद्यानात भरवण्यात आले आहे. यामध्ये गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांच्या चर्चेस, मुसलमानांची मशिद आदींना स्थान देण्यात आले आहे; मात्र गोव्यात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या एकही मंदिराचे छायाचित्र अथवा माहिती या ठिकाणी नव्हती. ही बाब ‘सेरेंडिपिटी कला महोत्सवा’च्या आयोजकांना लक्षात आणून देऊन त्यांचे याविषयी प्रबोधन केल्यानंतर अखेर गोव्यातील मंदिराची छायाचित्रे आणि त्याविषयी माहिती असलेला फलक प्रदर्शनामध्ये लावण्यात आला.
‘सेरेंडिपिटी आर्ट फाऊंडेशन’ यांच्या वतीने पणजी शहरात १५ डिसेंबरपासून सेरेंडिपिटी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सर्जनशील ईकोसिस्टममध्ये सकारात्मक पालट करण्याच्या दृष्टीने हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून यामध्ये देशी, विदेशी लोक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या महोत्सवाच्या अंतर्गत गोव्यातील जीवनपद्धतीवर आधारित प्रदर्शनामध्ये गोव्यातील मोठमोठ्या चर्चस, फोंडा येथील साफा मशिद आदींचा छायाचित्रांसह माहिती आहे; मात्र संपूर्ण प्रदर्शनामध्ये गोव्यात बहुसंख्य असलेल्या हिंदूची संस्कृती अथवा मंदिर आदींना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे गोव्याविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होणार असल्याने हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. महेश प्रभु यांना ही बाब त्वरित प्रदर्शनातील संबंधित अधिकार्यांच्या लक्षात आणून दिली. संबंधित अधिकार्यांनी याविषयी महोत्सवाचे ‘क्युरेटर’ श्री. अक्षय महाजन यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि श्री. महेश प्रभु यांनी ‘क्युरेटर’ श्री. अक्षय महाजन यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. गोव्यातील जीवन पद्धतीवर आधारित प्रदर्शनामध्ये हिंदु संस्कृती आणि मंदिरे यांना स्थान देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी ‘क्युरेटर’ श्री. अक्षय महाजन यांनी स्वीकारली आणि २१ डिसेंबर या दिवशी सायंकाळपर्यंत गोव्यातील विविध मंदिरांचे छायाचित्र आणि माहिती असलेला एक फलक सिद्ध करून तो प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केला. तसेच पुढील वर्षी प्रदर्शनात हिंदु संस्कृती आणि मंदिरे यांविषयी माहिती देण्यासाठी समितीला संधी देणार असल्याचे आश्वासन दिले. हिंदु जनजागृती समितीला सेरेंडिपिटी कला महोत्सवाचे ‘क्युरेटर’ श्री. अक्षय महाजन यांच्याशी समन्वय साधण्यासाठी महोत्सवाशी निगडित असलेले पणजी येथील उद्योजक श्री. सदानंद ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले आणि मंदिरांविषयीचा फलक प्रदर्शित होईपर्यंत त्याविषयी संबंधितांकडे पाठपुरावा केला.

आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी,
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)
Photo Caption – हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर ‘सेरेंडिपिटी कला महोत्सवा’च्या प्रदर्शनात हिंदूंच्या मंदिरांविषयी माहिती असलेला हा फलक लावण्यात आला