*जीटीडीसीकडून महिला दिनानिमित्त विशेष ऑफर जाहीर : जीटीडीसीच्या निवासस्थानांवर ५०% सूट*
*पणजी, ७ मार्च, २०२५*: जगभरात ८ मार्च रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) महिलांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी एक विशेष उपक्रम जाहीर केला आहे. ७ ते ९ मार्च २०२५ पर्यंत गोव्यातील जीटीडीसीच्या सर्व निवासस्थानांमध्ये (रेसिडन्सी) रूम बुकिंग करणाऱ्या महिलांना मुक्काम करण्यासाठी ५०% सूट मिळणार आहे.
या उपक्रमाचे महत्त्व सांगताना, जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर म्हणाले, की “आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही सर्व क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे कौतुक करतो. ही भावना साजरी करण्यासाठी जीटीडीसी, महिलांना स्वत:साठी वेळ काढून प्रवास करण्यास आणि गोव्यातील वैविध्यपूर्ण ऑफरचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष सवलत देत आहे.”
जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुलदीप आरोलकर म्हणाले, की “जीटीडीसीमध्ये, आम्ही गोव्यातील पर्यटन अधिक समावेशक आणि प्रवेशयोग्य बनवण्यास वचनबद्ध आहोत. महिलांना प्रवास करताना त्यांचे स्वागत करण्यास आणि त्यांना खास वाटेल याची खात्री करण्यासाठी, हा उपक्रम म्हणजे एक पाऊल आहे. आम्ही महिलांना त्यांच्या कुटुंबियांसह गोव्याला भेट देण्यासाठी आणि जीटीडीसी मधील संस्मरणीय मुक्कामाचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”
प्रवासाचे अनुभव साजरे करण्यासाठी आणि गोव्याला सर्वांसाठी स्वागतार्ह ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, जीटीडीसी असे उपक्रम सुरू करत आहे. सर्व महिलांनी या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा आणि राज्यात राहण्याचा अविस्मरणीय असा आनंद घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. बुकिंगसाठी जीटीडीसीच्या www.goa-tourism.com संकेतस्थळाला भेट द्या किंवा ०८३२ – २४३८८६६ वर संपर्क करा.