हिंदु जनजागृती समितीची पणजी येथे ‘आयोनॉक्स’ व मडगाव येथे ओशिया मल्टिप्लेक्स यांच्या व्यवस्थापनाकडे मागणी
गोव्यात “उदयपूर फाईल्स” चित्रपट तातडीने प्रदर्शित करावा
पणजी, १० ऑगस्ट – गोव्यात “उदयपूर फाईल्स” चित्रपट तातडीने प्रदर्शित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पणजी येथील ‘आयोनॉक्स’ आणि मडगाव येथील ओशिया मल्टिप्लेक्स यांच्या व्यवस्थापनाकडे १० ऑगस्ट या दिवशी केली आहे. पणजी येथे हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री जयेश थळी, गोविंद चोडणकर, राज शर्मा, युवराज गावकर, सत्यवान म्हामल आदीचा समावेश होता. मडगाव येथील ओशिया मल्टिप्लेक्सचे अधिकारी देवब्रोता दास यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री गणेश जामदार, महेश बुरगुटे आणि राहुल मिश्रा यांचा समावेश होता
दिल्ली उच्च न्यायालयाने “उदयपूर फाईल्स” या चित्रपटावरील स्थगिती हटविली आहे. अमित जानी निर्मित आणि राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येवर आधारित असलेल्या या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, असे न्यायालयाने आपल्या निवाड्यात नमूद केले आहे. या निर्णयानंतर “उदयपूर फाईल्स” हा चित्रपट ८ ऑगस्टपासून देशभरातील ४,५०० चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. गोव्यातही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे “उदयपूर फाईल्स” हा चित्रपट गोव्यात तातडीने प्रदर्शित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ‘आयोनॉक्स’ च्या व्यवस्थापनाकडे केली आहे.
आपला नम्र,
डॉ.मनोज सोलंकी, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)
Photo caption — पणजी येथील ‘आयोनॉक्स’ च्या अधिकाऱ्याला निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये डावीकडून सर्वश्री काशेश्वर शिरोडकर, गोविंद चोडणकर, जयेश थळी, सत्यवान म्हामल, राज शर्मा आणि युवराज गावकर
Photo caption — मडगाव येथील ओशिया मल्टिप्लेक्सचे अधिकारी देवब्रोता दास यांना निवेदन देताना डावीकडून
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री गणेश जामदार, महेश बुरगुटे आणि राहुल मिश्रा