गोवा पर्यटनाकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण

.

*गोवा पर्यटनाकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण*

*पणजी, १४ ऑगस्ट २०२५* – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने पणजीत नोवोतेल गोवा येथे ‘होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेवर जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम विशेषतः विद्यमान आणि इच्छुक होमस्टे मालकांसाठी डिझाइन करण्यात आला होता, ज्यामध्ये महिलांना पर्यटन क्षेत्रात उद्योजक म्हणून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात आला.

या औपचारिक कार्यक्रमात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे; पर्यटन संचालक श्री केदार नाईक; आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुलदीप आरोलकर; माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे संचालक श्री कबीर शिरगावकर; एअरबीएनबीच्या सार्वजनिक धोरण प्रमुख सौ. अस्मिता जोशी; स्वयंरोजगार महिला संघटनेचे (सेवा) वरिष्ठ समन्वयक श्री तेजस रावल या कार्यक्रमात उपस्थित होते.

*या प्रसंगी बोलताना, माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे* यांनी समुद्रकिनाऱ्यांपलीकडे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागात नवीन उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. ते म्हणाले, की “गोव्यासाठी पर्यटन महत्त्वाचे आहे आणि आपले किनारी भाग दीर्घकाळापासून त्याच्याशी जोडलेले असले तरी, आपल्या गावातील अनेकांना विशेषतः महिलांना या क्षेत्रात आवश्यक तितका अनुभव मिळालेला नाही. महिला प्रत्येक घराचा आणि समाजाचा कणा आहेत. होमस्टे योजना ही त्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, ज्यामध्ये १०० महिलांना त्यांचे स्वतःचे होमस्टे सुरू करण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. आम्ही आमच्या गावांचे सौंदर्य दर्शविण्यासाठी एकादशा तीर्थने ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ या प्रवासाची सुरुवात केली होती आणि आता आम्ही या योजनेद्वारे त्याचा विस्तार करत आहोत. गोव्याचा अतुलनीय पाककृती वारसा, त्याच्या अद्वितीय घरगुती चवींसह पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. पर्यटनाच्या अँबेसेडर म्हणून महिला गोव्याला भारताची पाककृती राजधानी बनवण्यास मदत करू शकतात. मंत्री म्हणाले, की ही योजना पुढे शहरी भागात देखील विस्तारित केली जाईल.”

*पर्यटन संचालक श्री केदार नाईक म्हणाले,* की गोवा पर्यटनाचा उद्देश केवळ स्थळांना प्रोत्साहन देण्याऐवजी राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे. पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि अंतर्गत स्थळांवर प्रामाणिक अनुभव देण्यावर, त्याचबरोबर स्थानिक पर्यटनाला बळकटी देण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील महिलांना पायाभूत सुविधा विकसित करण्यास सक्षम करणे, हा एक प्रमुख उद्देश आहे, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.

*पर्यटन उपसंचालक सौ. दीक्षा नामदेव तारी* यांनी योजने विषयी माहिती दिली. तसेच या कार्यक्रमात एअरबीएनबी, सेवा आणि आयटी खाते यासारख्या भागीदारांनी मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि डिजिटल साधनांवरील व्यावहारिक अंतर्दृष्टी सामायिक केली. गेल्या २५ वर्षांपासून हा व्यवसाय चालवणाऱ्या गुजरातमधील मीताबेन होमस्टेच्या मालक, सौ. मीता परमार यांनी त्यांची कहाणी सांगितली.

कार्यक्रमात सत्काराचा एक भाग म्हणून, तांबडी सुर्ला जंगल ट्रेल्सच्या मालकीण जानकी रामा सामकर आणि फोंडा येथील कोझी होम्सच्या मालकीण सोनिया रॉय साल्डान्हा यांना सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली.

स्थानिक, विशेषतः अंतर्गत प्रदेशातील महिलांना त्यांच्या घराचा काही भाग, पर्यटकांसाठी स्वागतार्ह मुक्कामध्ये रूपांतरित करून शाश्वत उपजीविकेची संधी प्रदान करणे, हा होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट योजनेचा उद्देश आहे. सत्तरी, धारबांदोडा, सांगे, डिचोली, फोंडा, केपे, काणकोण यासारख्या दुर्गम तालुक्यांना व्यापून ही योजना संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध गावांना पर्यटन लाभ मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करते.

गोव्याचा सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक परिसर आणि पारंपारिक आदरातिथ्याचा वापर करून, ही योजना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करते तसेच महिलांना स्वावलंबी बनण्यास, स्थानिक परंपरा जपण्यास आणि प्रवाशांना प्रामाणिक गोव्याचे जीवन दाखवण्यास सक्षम बनवते.

जीटीडीसीचे पीआरओ आणि उपमहाव्यवस्थापक श्री दीपक नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, ज्यामुळे एक उबदार आणि आकर्षक वातावरण निर्माण झाले. पर्यटन उपसंचालक सौ. दीक्षा नामदेव तारी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल मान्यवर, भागीदार, सहभागी आणि आयोजक संघाचे आभार व्यक्त केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें