श्रीअंश सुभाजीचे यश..

.

श्रीअंश सुभाजीचे यश..… नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये श्रीअंश ज्ञानेश्वर सुभाजी याने तालुका तसेच राज्यपातळीवर घवघवीत यश प्राप्त केले. अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान आयोजित राज्य स्तरीय नाट्य छटा स्पर्धेत दुसरे बक्षीस, भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी प्रित्यर्थ वकृत्व स्पर्धेत तिसरे बक्षीस, शणै गोयबाब कथाकथन स्पर्धेत चौथे बक्षीस. तसेच तालुका पातळीवर लोकमान्य जयंती निमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत पहिले बक्षीस, भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी प्रित्यर्थ आयोजित वकृत्व स्पर्धेत पहिले बक्षीस तसेच शणै गोयबाब कथाकथन स्पर्धेत दुसरे बक्षीस प्राप्त केले. श्रीअंश सुभाजी हा हरमल पंचक्रोशी हायस्कूल, हरमल इथे इयत्ता आठवीत शिकत आहे. त्याच्या या यशात त्याला शिक्षिका दिव्या पिंगुळकर आणि शिक्षिका सनीला साळगावकर याचं मार्गदर्शन लाभलं. त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, पालक व शिक्षकांनी  कौतुक केलं.

फोटो श्री अंश सुभाजी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें