वोल्वो बॉईज हणखणे आयोजित गणेश देखावे स्पर्धा.
गणेश चतुर्थी आली म्हणजे गणेश देखावे आलेच . आपल्या गावातही असेच गणेश देखावे व्हावे म्हणून हणखने गावातील युवा मुलांचां गट वोल्वो बॉईज यांनी इको फ्रेंडली या थीम अंतर्गत गणेश देखाव्याची व रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. हणखने हा गाव अनेक सुख सोयींपासून वंचित आहे. गोव्यातील बाकीच्या गावांबरोबर आपल्या गावातील लोकांनी प्रगतीची वाटचाल करावी हाच हेतू या ग्रुपचा आहे. हा ग्रुप स्वतःच्या हिमतीवर आपले वेगवेगळे उद्देश्य साकार करीत असतात. स्वतःकडील निधी गोळा करून ते गावात वेगवेगळे उपक्रम कुमार आकाश भिकाजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली राबवीत असतात.
घराघरात गणेश देखावे व रांगोळी स्पर्धा ठेवण्याचा उद्देशही हाच होता. यंदाच्या वर्षी 12 एंट्रीज आल्या होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हसापूर गावचे रहिवासी श्री संजय नाईक लाभले होते ते विद्युत खात्यात कार्यरत असून त्यांना गणपती सजावट करण्यात आवड आहे वर्षानुवर्षे ते आपल्या घरी पण गणेश चतुर्थीचे औचित्य साधून विज्ञान युक्त सजावट करत असतात.त्यांच्याकडून ग्रुपच्या युवा पिढीला तसेच गावातल्या लोकांनाही भरपूर प्रोत्साहन मिळाले.
गणेश देखाव्यासाठी पहिले पारितोषिक श्री विठ्ठल वरक आणि कुटुंबीय .
दुसरे पारितोषिक कुमार विघ्नेश तळवणकर आणि कुटुंबीय
तिसरे पारितोषिक श्री विष्णू नाईक आणि कुटुंबी.
रांगोळी स्पर्धेसाठी कुमार रिषभ नाईक आणि कुटुंबीय, श्री किरण नाईक आणि कुटुंबीय तसेच कुमार अर्जुन फट्टे आणि कुटुंबीय यांना पारितोषिके मिळाली.
यंदाच्या वर्षी गावातील लोकांना भरपूर प्रोत्साहन दिले म्हणून यूट्यूब फेसबुक व न्यूज चैनल वर वोल्वो बॉईज हणखने या ग्रुपला भरपूर लोकांकडून प्रोत्साहन मिळत आहे.