हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम*

.

दिनांक : १३.११.२०२१

*हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम*

*हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १५ नोव्हेंबर या दिवशी होणारा कार्यक्रम रहित*
पणजी, १३ नोव्हेंबर – सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा ‘डोंगरी टू नोवेअर’ (Dongri to Nowhere) हे शीर्षक असलेला कार्यक्रम गोव्यात सोमवार, १५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता ‘एल्.व्ही.सी. कॉमेडी क्लब’ येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तिकिटे ‘बूक माय शो’वर विक्रीस उपलब्ध आहेत. मुनव्वर फारूकी याची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची पार्श्‍वभूमी पाहता, तसेच गोव्यातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा गोव्यातील कार्यक्रम रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मामु हागे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सत्यविजय नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, संजय नायक, भारत हेगडे, केशव चोडणकर आणि सुशांत दळवी यांची उपस्थिती होती. या निवेदनाची प्रत पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष देसाई, पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि ‘काकुलो मॉल’चे व्यवस्थापक यांना देण्यात आली आहे. निवेदन दिल्यानंतर काकुलो मॉलच्या व्यवस्थापकांनी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा ‘डोंगरी टू नोवेअर’ हा १५ नोव्हेंबर या दिवशीचा कार्यक्रम रहित केल्याचे हिंदु जनजागृती समितीला कळविले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदु देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या वेळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. ३७ दिवस ते तुरुंगात होते. कार्यक्रमाची रितसर अनुमती न घेणे, कोरोना काळात नियम न पाळणे, हिंदूंच्या देवतांवर अत्यंत आक्षेपार्ह टीका करणे यांमुळे सत्र आणि उच्च न्यायालयाने त्यांना जामीन फेटाळला होता. त्यांनी यापूर्वीही अनेकदा हिंदु देवतांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांची इंदूर येथील कारागृहातून फेब्रुवारी २०२१ मध्ये जामिनावर सुटका झाली आहे. या व्यतिरिक्त ‘सी.ए.ए.’ कायदा, ‘ग्रोधा हत्याकांडातील कारसेवकांचा मृत्यू’, आदीविषयीही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केलेली आहेत. त्यांच्या अनेक आक्षेपार्ह वक्तव्यांची माहिती आणि व्हिडिओ आजही ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध आहे. गोव्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी हा कार्यक्रम तात्काळ रहित करावा.

आपला विश्‍वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,राज्य समन्वयक, गोवा,*
हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar