सावतावाडा-  कळंगुट खुन प्रकरणातील संशयित नितीन गडेकरला अटक

.
म्हापसा  दि 14  ( प्रतिनिधी )
       सावतावाडा-कळंगुट येथील जोजफ फर्नाडीस (57)  या वृद्धाचे डोके जमीनीवर आढळून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणांवरून त्याच भागातील  नितीन गडेकर (38) या संशयित तरुणास  कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे.
             कळंगुट पोलिसांकडून मिळालेल्या अधीक  माहितीनुसार, सावतांवाडा कळंगुट येथील नितीन दीना गडेकर (38) रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आपल्या पुर्वाश्रमीच्या पत्नी असलेल्या एलिझाबेथ फर्नाडीस यांना त्या याभागात चालवत असलेल्या रेस्टॉरंट्ममध्ये भेटावयास आले होते. दरम्यान, यावेळी त्यांच्यात असलेल्या पुर्ववैमनस्यातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणी  गडेकर यांनी एलिझाबेथ यांना त्यांच्या केसांना धरून जबर मारहाण करण्यास सुरूवात केली.  दरम्यान, एलिझाबेथचे किंचाळणे ऐकून तेथे धांव घेतलेल्या जोजफ फर्नाडीस (57) यांच्यावर नितीनने जोरदार हल्ला चढवित त्यालाही लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी त्याला खाली पाडून तेथील  सिमेंट कॉक्रीटच्या बांधकामावर सतत तीनचार वेळा  जोजफचे जोरदार डोके आपटुन त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळंगुटचे पोलिस स्थांनकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत तात्काळ जखमी जोजफला उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठविले परंतु या मारहाणीत डोक्याला जबर मार बसलेल्या जोजफ याचे वाटेतच निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
             संशयित नितीन गडेकर याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नोलास्को रापोझ करीत आहेत.
  फोटो……..सावतावाडा-  कळंगुट खुन प्रकरणातील संशयित नितीन गडेकर याच्यासमवेत कळंगुट पोलिस पथक…….
..

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar