पंचायतीने वार्षिक जमाखर्च ताळेबंद प्रत ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांस द्यावी,अशीं सुचना दिगंबर कोरकणकर यानी केली.प्रत्येक अस्थापनांचे नूतनीकरण शुल्क वसुली करताना त्याची नोंदणी ठेवावी अशी सूचना केली.पंचायत क्षेत्रात आवश्यक सुविधांचा अभाव असूनही वीज,पाणीसाठी, ना हरकत दाखले देऊ नये असे काहींनी सुचविले.वीज सब स्टेशन अत्यंत महत्त्वाचे असून त्याची उभारणी लवकर पूर्ण करण्यासाठी ठराव संमत केला.केरी फिडर प्रभावीपणे कार्यान्वीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत असा ठराव मंजूर केला.मधलावाडा सेंट अँथनी कपेलजवळ रस्त्यावर पाणी साचून राहते त्यावर उपाययोजना करावी अशी सूचना केली आहे.
यावेळी उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस, पंच अनंत गडेकर, प्रवीण वायंगणकर,दिव्या वायंगणकर,प्रतीक्षा नाईक,गुणाजी ठाकूर,इनासियो डिसौझा व गटविकास कार्यालयाचे निरीक्षक संतोष नाईक उपस्थित होते.यावेळी माजींपंच प्रभाकर वायंगणकर,अनिल बर्डे,प्रभाकर सत्यवान नाईक व अन्य लोकांना श्रद्धांजली अर्पण केली.सदर ठराव माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी मांडला होता.यावेळी बॉस्को फेर्नांडिस,संजय नाईक,राजन वायंगणकर,मथियास फेर्नांडिस,संतान फेर्नांडिस, रुजाय फेर्नांडिस, मार्सेलिन फेर्नांडिस, इलियास फेर्नांडिस आदींनी चर्चेत भाग घेतला
शेवटी पंच इनासियो डिसौझा यांनी आभार मानले.
पंचायतीने वार्षिक जमाखर्च ताळेबंद प्रत ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांस द्यावी

.
[ays_slider id=1]